मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL All Time XI : गावसकरांच्या टीममध्ये या खेळाडूंना संधी

IPL All Time XI : गावसकरांच्या टीममध्ये या खेळाडूंना संधी

आयपीएलचा यंदाचा 14 वा सिझन (IPL 2021) असेल, याआधी झालेल्या 13 मोसमांमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विक्रमी कामगिरी करत या लीगला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आतापर्यंतच्या सर्वोत्तम आयपीएल टीमची निवड केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 8 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला सुरूवात व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलचा यंदाचा 14 वा सिझन असेल, याआधी झालेल्या 13 मोसमांमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विक्रमी कामगिरी करत या लीगला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आतापर्यंतच्या सर्वोत्तम आयपीएल टीमची निवड केली आहे. गावसकरांच्या टीममध्ये धोनी, विराट, रोहित आणि रैना या भारतीयांना स्थान मिळालं आहे.

चेन्नई सुपरकिंग्सना तीनवेळा आयपीएल जिंकवणाऱ्या धोनीला (MS Dhoni) गावसकरांनी कर्णधार बनवलं आहे. या टीममध्ये गावसकरांनी 7 भारतीय आणि 4 परदेशी खेळाडूंची निवड केली आहे. तसंच आश्चर्यकारकरित्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) गावसकरांनी 12वा खेळाडू ठेवला आहे. तर ओपनिंगची जबाबदारी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि क्रिस गेल (Chris Gayle) यांच्यावर आहे.

रोहितने मुंबईला सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात मदत केली, पण तरीही गावसकरांनी एमएस धोनीलाच टीमचं नेतृत्व दिलं आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 188 मॅचमध्ये नेतृत्व केलं, यातल्या 110 सामन्यांमध्ये त्याच्या टीमचा विजय झाला. धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅच जिंकणारा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. विराटने 192 सामन्यांमध्ये 5,878 रन केले आहेत. तर रोहितने 200 सामन्यांमध्ये 5,230 रन केले आहेत.

गावसकरांच्या टीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आणि पाचव्या क्रमांकावर सुरेश रैनाला (Suresh Raina) स्थान देण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने आयपीएलमध्ये 5,368 रन केले आहेत, तर वॉर्नरने 142 सामन्यांमध्ये 42.71 च्या सरासरीने 5,254 रन केले.

गावसकरांनी सहाव्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) आणि सातव्या क्रमांकावर एमएस धोनीची निवड केली आहे. धोनीच या टीमचा विकेट कीपरही आहे. यानंतर त्यांनी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सुनिल नारायण (Sunil Narine) या दोन स्पिनरवर विश्वास दाखवला आहे. तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) आणि भुवनेश्वर कुमारवर (Bhuvneshwar Kumar) सोपावली आहे.

गावसकरांची आयपीएल टीम

रोहित शर्मा, क्रिस गेल, डेविड वॉर्नर, विराट कोहली, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जडेजा, सुनील नरेन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा (12वा खेळाडू)

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Sunil gavaskar