मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 357 सिक्स मारणाऱ्या महान खेळाडूने सोडली आयपीएल, गावसकरांनी घेतली टीमची 'शाळा'

IPL 2021 : 357 सिक्स मारणाऱ्या महान खेळाडूने सोडली आयपीएल, गावसकरांनी घेतली टीमची 'शाळा'

कोरोना व्हायरस आणि बायो-बबलमुळे यंदाच्या आयपीएलमधून (IPL 2021) काही खेळाडूंनी माघार घेतली आहे, तर काही खेळाडू आयपीएल अर्ध्यात सोडून जात आहेत. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) महान खेळाडू क्रिस गेलही (Chris Gayle) त्यातलाच एक.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 2 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस आणि बायो-बबलमुळे यंदाच्या आयपीएलमधून (IPL 2021) काही खेळाडूंनी माघार घेतली आहे, तर काही खेळाडू आयपीएल अर्ध्यात सोडून जात आहेत. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) महान खेळाडू क्रिस गेलही (Chris Gayle) त्यातलाच एक. दोनच दिवसांपूर्वी बायो-बबलला कंटाळून आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी गेलने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. क्रिस गेल 42 वर्षांचा झाला आहे, तसंच पुढच्या मोसमाआधी खेळाडूंचा लिलाव होणार आहे, त्यामुळे गेल पुन्हा आयपीएल खेळताना दिसेल का नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यापद्धतीने गेलने आयपीएलमधून माघार घेतली ते पाहून सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी पंजाब किंग्सवर निशाणा साधला आहे.

स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना पीटरसन म्हणाला, 'गेलला वाढदिवसाच्या दिवशीच राजस्थानविरुद्धच्या मॅचमधून बाहेर ठेवण्यात आलं. गेलला चांगली वागणूक दिली गेली नाही. पंजाबच्या टीममधून बाहेर जाणंच योग्य असल्याचं त्याला वाटलं असेल. वाढदिवशीच त्याला खेळण्याची संधी दिली गेली नाही. तो 42 वर्षांचा आहे, जर तो खूश नसेल तर त्याला हे करायचा अधिकार आहे.'

दुसरीकडे सुनिल गावसकर यांनीही पंजाब किंग्सच्या रणनितीवरच प्रश्न उपस्थित केले. 'वय झालं असलं तरी गेल गेम चेंजर आहे. काही वेळामध्येच तो खेळ बदलू शकतो. पंजाबचं त्याची गैरहजेरीत नुकसान होऊ शकतं. गेलला सारखं आत-बाहेर करण्यात नेमकी काय रणनिती आहे, ते मला माहिती नाही. तो 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे, त्यामुळे प्रत्येक सामन्यात तो चांगली बॅटिंग करेल, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, पण तो गेम चेंजर नक्कीच आहे,' असं गावसकर म्हणाले.

गेलने गुरुवारी रात्री आयपीएल सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. मागच्या काही महिन्यांपासून मी वेस्ट इंडिज, सीपीएल आणि यानंतर आयपीएल बायो-बबलचा भाग आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मला वेस्ट इंडिजची मदत करायची आहे, त्यामुळे स्वत:ला मानसिकदृष्ट्या ताजेतवाने ठेवण्यासाठी मी आयपीएलमधून माघार घेत आहे, असं गेल म्हणाला. गेलने आयपीएलच्या या मोसमात 10 मॅच खेळून 21.44 च्या सरासरीने 193 रन केल्या. या मोसमात त्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही.

First published:

Tags: Chris gayle, IPL 2021, Punjab kings