• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: कोरोनामुळे कडक निर्बंध, मुंबईत मॅच होणार का नाही? गांगुलीने दिलं उत्तर

IPL 2021: कोरोनामुळे कडक निर्बंध, मुंबईत मॅच होणार का नाही? गांगुलीने दिलं उत्तर

आयपीएल (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, त्याआधी सगळ्या टीमच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये वाढत्या कोरोना (Corona in Mumbai) रुग्णांच्या संख्येमुळे सामने दुसरीकडे हलवले जातील अशी चर्चा होती, यावर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 5 एप्रिल : आयपीएल (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, त्याआधी सगळ्या टीमच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये वाढत्या कोरोना (Corona in Mumbai) रुग्णांच्या संख्येमुळे सामने दुसरीकडे हलवले जातील अशी चर्चा होती, यावर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला तरी तिकडे सामने खेळवले जातील, असं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. मुंबईमध्ये यावर्षी आयपीएलचे 10 सामने होणार आहेत. टेलिग्राफची बोलताना गांगुली म्हणाला, 'लॉकडाऊन लावण्यात आलं तरं चांगलं आहे, कारण आजूबाजूला जास्त माणसं नसतील. काही लोकांवरच लक्ष द्यावं लागेल जे बायो-बबलमध्ये आहेत. त्यांचं वारंवार टेस्टिंगही केलं जात आहे. जेव्हा तुम्ही बायो-बबलमध्ये जाल तेव्हा काही होऊ शकत नाही. मागच्यावर्षी युएईमध्ये स्पर्धा सुरू होण्याआधीही अशा घटना घडल्या होत्या. एकदा स्पर्धा सुरू झाल्यानंतर गोष्टी नीट होतील.' मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं तरी काही अडचणी येणार नाहीत, कारण आम्ही सरकारकडून मॅचच्या आयोजनासाठी आधीच परवानगी घेतली आहे, असंही गांगुलीने सांगितलं. मुंबईमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान 10 मॅच होणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या चार टीमचे सामने मुंबईमध्ये होतील. 22 जणांना कोरोनाची लागण आयपीएलशी संबंधित 22 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये बँगलोरच्या टीममधला देवदत्त पडिक्कल, केकेआरचा नितीश राणा, दिल्लीचा अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय चेन्नई सुपरकिंग्सच्या कंटेंट टीमचा एक सदस्य, वानखेडे स्टेडियममधले 10 कर्मचारी आणि बीसीसीआयने नियुक्त केलेल्या 8 सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
  Published by:Shreyas
  First published: