मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : ...म्हणून स्कॉट स्टायरिसला मागावी लागली धोनीच्या CSK ची माफी

IPL 2021 : ...म्हणून स्कॉट स्टायरिसला मागावी लागली धोनीच्या CSK ची माफी

आयपीएलच्या 14व्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) आयपीएल 2021 बाबत भविष्यवाणी केली आहे. स्टायरिसने एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईला (CSK) पॉईंट्स टेबलमध्ये सगळ्यात शेवटी ठेवलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 एप्रिल : आयपीएलच्या 14व्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. नेहमीप्रमाणेच नव्या मोसमाआधी क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञ नव्या मोसमासाठी उत्सुक दिसत आहे. आयपीएलची पहिली मॅच जशी जवळ येत आहे, तसे क्रिकेटपटू भविष्यवाणी करताना दिसत आहेत. आयपीएलची यावेळची स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे फक्त 6 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबादचा समावेश आहे. आयपीएलची फायनल 30 मे रोजी होईल.

न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) आयपीएल 2021 बाबत भविष्यवाणी केली आहे. आयपीएल सुरू होण्याआधी स्टायरिसने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत मोसमाच्या शेवटी पॉईंट्स टेबल कसं असेल याचं भाकीत केलं आहे. या ट्वीटमध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईला (CSK) पॉईंट्स टेबलमध्ये सगळ्यात शेवटी दाखवण्यात आलं आहे. स्टायरिसच्या या ट्वीटवर चेन्नई सुपरकिंग्सनेही प्रत्युत्तर दिलं आहे.

मागच्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या 13व्या मोसमात चेन्नईची टीम 7 व्या क्रमांकावर राहिली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं नव्हतं. आता यावेळीही स्टायरिसच्या ट्वीटने चेन्नईचे चाहते नाराज झाले. स्टायरिसच्या या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर दाखवण्यात आली आहे.

स्टायरिसला प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून त्याचाच चेन्नईच्या जर्सीमधला फोटो शेयर केला आहे. स्टायरिस चेन्नईकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. चेन्नईची कामगिरी अशी राहिल, असं तुला का वाटतंय? असा सवाल या ट्वीटमधून विचारण्यात आला आहे. यानंतर स्कॉट स्टायरिसने चेन्नईच्या टीमची माफी मागितली.

स्टायरिस आयपीएलमध्ये चेन्नईसोबतच हैदराबादच्या टीमकडूनही खेळला. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्टायरिस कॉमेंट्री करताना दिसतो. स्टायरिसप्रमाणेच आकाश चोप्रा यानेही चेन्नईला यावर्षीही प्ले-ऑफ गाठता येणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. यावर्षी चेन्नईचा पहिला सामना 10 एप्रिलला दिल्लीविरुद्ध मुंबईत होणार आहे.

चेन्नईची टीम

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसी, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, आर साई किशोर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरी निशांत

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni