IPL 2021 : RCB च्या विजयासोबतच मुंबई इंडियन्सना धक्का

IPL 2021 : RCB च्या विजयासोबतच मुंबई इंडियन्सना धक्का

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) विजयाची हॅट्रिक साधली आहे.

  • Share this:

चेन्नई, 18 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) विजयाची हॅट्रिक साधली आहे. यंदाच्या मोसमात एकही पराभव न झालेली बँगलोर ही एकमेव टीम आहे. रविवारी दुपारी कोलकात्याविरुद्धच्या (KKR) सामन्यात आरसीबीचा 38 रनने विजय झाला. या विजयासोबतच बँगलोरच्या टीमने मुंबईला (Mumbai Indians) धक्का देत पॉईंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे.

तीन मॅचमध्ये तीन विजय मिळवल्यामुळे 6 पॉईंट्ससह बँगलोर पहिल्या क्रमांकावर आहे, तर तीन पैकी दोन सामने जिंकलेली मुंबई 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. चेन्नई (CSK), दिल्ली (Delhi Capitals), राजस्थान (Rajasthan Royals), पंजाब (Punjab Kings) यांनी दोनपैकी एक सामना जिंकला आहे, पण नेट रन रेटमुळे चेन्नई तिसऱ्या, दिल्ली चौथ्या, राजस्थान पाचव्या क्रमांकावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने 3 सामन्यात एक विजय मिळवला आहे, पण त्यांचा नेट रन रेट पंजाबपेक्षा चांगला असल्यामुळे ते सहाव्या आणि पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. तर सनरायजर्स हैदराबादला (SRH) या मोसमात अजूनपर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही, त्यामुळे ते शेवटच्या क्रमांकावर आहेत.

Published by: Shreyas
First published: April 18, 2021, 8:31 PM IST

ताज्या बातम्या