मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : संजू सॅमसनने पुन्हा खिशात टाकलं नाणं, जाणून घ्या कारण

IPL 2021 : संजू सॅमसनने पुन्हा खिशात टाकलं नाणं, जाणून घ्या कारण

आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) टॉससाठीची नाणी खिशात टाकल्यामुळे चर्चेत आहे.

मुंबई, 20 एप्रिल : आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) टॉससाठीची नाणी खिशात टाकल्यामुळे चर्चेत आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings) पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने टॉससाठी उडवलेलं नाणं खिशात टाकलं, यानंतर आता चेन्नईविरुद्धच्या (CSK) सामन्यातही संजूने तेच केलं. सॅमसनला असं करताना पाहून धोनीही (MS Dhoni) हैराण झाला.

संजी सॅमसन यावेळी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये एखाद्या टीमचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या टॉसची नाणी जमवण्याचा छंदच जणू सॅमसनला लागला आहे. यंदाच्या मोसमातल्या 12व्या सामन्यात जेव्हा धोनीने नाणं उडवलं त्यानंत लगेचच संजूने हे नाणं खिशात टाकलं.

पंजाबविरुद्धच्या सामन्यातही त्याने असंच केलं होतं, पण मॅच रेफ्रीने त्याला नाणं परत द्यायला सांगितलं. असं करायला परवानगी नसल्याचं रेफ्रीने सांगितल्याचं संजू म्हणाला. यानंतर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात वेगळा रेफ्री होता, त्यामुळे संजूने पुन्हा नाणं स्वत:कडे ठेवून घेतलं. आपली इच्छा बोलून दाखवण्यासाठी तो कॉमेंटेटर सायमन डूलकडे गेला. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकला असला तरी सामना मात्र चेन्नईने 45 रनने जिंकला.

First published:
top videos

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Punjab kings, Rajasthan Royals, Sanju samson