मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : मुंबई इंडियन्सना मोठा धक्का, रोहितला मिळणार नाही 'विश्वासू' खेळाडूची साथ

IPL 2021 : मुंबई इंडियन्सना मोठा धक्का, रोहितला मिळणार नाही 'विश्वासू' खेळाडूची साथ

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या वर्षाचा मोसम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्लीच्या (Delhi Capitals) टीमना मोठा धक्का लागला आहे.

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या वर्षाचा मोसम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्लीच्या (Delhi Capitals) टीमना मोठा धक्का लागला आहे.

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या वर्षाचा मोसम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्लीच्या (Delhi Capitals) टीमना मोठा धक्का लागला आहे.

मुंबई, 19 मार्च : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या वर्षाचा मोसम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण त्याआधी मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्लीच्या (Delhi Capitals) टीमना मोठा धक्का लागला आहे. पाकिस्तानची टीम पुढच्या महिन्यात 3 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेने टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये टी-20 सीरिजसाठी आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही, पण वनडे टीममध्ये मात्र मुंबईचा क्विंटन डिकॉक (Quinton De Kock), राजस्थानचा डेव्हिड मिलर (David Miller), चेन्नईचा लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) आणि दिल्लीचे कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि एनरिच नॉर्किया (Enrich Norkia) यांचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातल्या वनडे सीरिजची शेवटची मॅच 7 एप्रिलला होणार आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतात येतील. नियमांनुसार या खेळाडूंना 7 ते 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, त्यामुळे त्यांना आयपीएलच्या सुरुवातीच्या 2 ते 4 मॅच खेळता येणार नाहीत.

मुंबई काय करणार?

क्विंटन डिकॉक हा मुंबईच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. रोहित शर्मासोबत ओपनिंग करणाऱ्या डिकॉकने मागच्या दोन मोसमात मुंबईला ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अशात जर डिकॉक सुरूवातीला उपलब्ध नसेल, तर रोहित शर्माकडे क्रिस लिन किंवा इशान किशनला ओपनिंगला खेळवण्याचा पर्याय आहे. मागच्या मोसमात रोहितला दुखापत झाली होती, तेव्हा इशान किशनच मुंबईसाठी ओपनिंगला खेळला होता. क्रिस लिनला मात्र मुंबईने अजून एकदाही संधी दिलेली नाही.

दिल्लीचं मोठं नुकसान

कागिसो रबाडा आणि एनरिच नॉर्किया हे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील प्रमुख अस्त्र आहेत. हे दोन्ही खेळाडू सुरूवातीच्या काही मॅचसाठी उपलब्ध नसतील तर त्यांची बॉलिंग मात्र कमकूवत होईल.

तीन खेळाडू संपूर्ण मोसम खेळणार

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस, फाफ डुप्लेसिस आणि लेग स्पिनर इम्रान ताहीर आयपीएलचा संपूर्ण मोसम खेळतील, कारण त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याच टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. मॉरिसला या मोसमात राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. याचसोबत मॉरिस हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. तर इम्रान ताहीर आणि डुप्लेसिस चेन्नईकडून खेळतात.

यंदाच्या वर्षाची आयपीएल 9 एप्रिल ते 30 मेपर्यंत होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमुळे यावेळी स्पर्धा मे महिन्यातच संपवण्यात येणार आहे. टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai Indians, Quinton de kock