• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : पंजाब किंग्समध्ये फक्त 43 सिक्स मारणाऱ्याला संधी, हजार सिक्स मारणारा बाहेर

IPL 2021 : पंजाब किंग्समध्ये फक्त 43 सिक्स मारणाऱ्याला संधी, हजार सिक्स मारणारा बाहेर

पंजाब किंग्सने आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडच्या आपल्या पहिल्या सामन्यात (Punjab Kings vs Rajasthan Royals) क्रिस गेलला (Chris Gayle) मैदानात उतरवलं नाही.

 • Share this:
  दुबई, 21 सप्टेंबर : पंजाब किंग्सने आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडच्या आपल्या पहिल्या सामन्यात (Punjab Kings vs Rajasthan Royals) क्रिस गेलला (Chris Gayle) मैदानात उतरवलं नाही. गेल टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू आहे. एवढच नाही तर या फॉरमॅटमध्ये 14 हजार रन करणारा तो एकमेव खेळाडू आहे. क्रिस गेल याचा आज 42 वा वाढदिवस आहे. पंजाबने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात एडन मार्करमला (Aiden Markram) संधी दिली. मार्करमने टी-20 मध्ये फक्त 43 सिक्स लगावले आहेत. या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेलने आपल्या टी-20 करियरमध्ये 446 मॅच खेळून 37 च्या सरासरीने 14,261 रन केले, यात 22 शतकं आणि 87 अर्धशतकांचा समावेश आहे. एवढच नाही तर त्याने या फॉरमॅटमध्ये 1,104 फोर आणि 1,042 सिक्स मारल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने 59 टी-20 सामन्यांमध्ये 31 च्या सरासरीने 1,424 रन केले आणि 12 अर्धशतकं केली. मार्करमच्या नावावर 43 सिक्स आहेत, म्हणजेच गेलपेक्षा 999 कमी सिक्स त्याने मारल्या आहेत. मार्करमचा हा आयपीएलमधला पहिलाच सामना आहे. पंजाबसाठी प्रत्येक मॅच महत्त्वाची पंजाब किंग्सला या मोसमात सुरुवातीच्या 8 पैकी फक्त 3 मॅच जिंकता आल्या. 6 पॉईंट्ससह पंजाब पॉईंट्स टेबलमध्ये 7व्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्सने 7 पैकी 3 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. 6 पॉईंट्ससह राजस्थान 6व्या क्रमांकावर आहे. पंजाबची टीम केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मयंक अग्रवाल, एडेन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुडा, फॅबियन एलन, आदिल रशीद, इशान पोरेल, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी राजस्थानची टीम एव्हिन लुईस, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, रियान पराग, महिपाल लोमरोर, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, कार्तिक त्यागी
  Published by:Shreyas
  First published: