IPL 2021 : अनिल कुंबळेला पंजाबच्या या खेळाडूमध्ये दिसतेय पोलार्डची झलक

IPL 2021 : अनिल कुंबळेला पंजाबच्या या खेळाडूमध्ये दिसतेय पोलार्डची झलक

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही अनेक नवोदित खेळाडू चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. आयपीएल सुरू होण्याआधी पंजाब किंग्सचे (Punjab Kings) डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी टीमचा युवा बॅट्समन शाहरुख खानचं (Shahrukh Khan) कौतुक केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही अनेक नवोदित खेळाडू चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. आयपीएल सुरू होण्याआधी पंजाब किंग्सचे (Punjab Kings) डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी टीमचा युवा बॅट्समन शाहरुख खानचं (Shahrukh Khan) कौतुक केलं आहे. शाहरुख खानमध्ये आपल्याला वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कायरन पोलार्डची (Kieron Pollard) झलक दिसते, असं अनिल कुंबळे म्हणाले आहेत. कुंबळेनी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नेटमध्ये पोलार्डला बॉलिंग केली आहे. शाहरुखमध्येही पोलार्डसारखीच क्षमता असल्याची प्रतिक्रिया कुंबळे यांनी दिली आहे.

'शाहरुख खानला बघितल्यावर मला पोलार्डची आठवण येते. जेव्हा मी मुंबई इंडियन्समध्ये होतो तेव्हा पोलार्ड नेटमध्ये धोकादायक होता. जेव्हा मी बॉलिंग करायचो तेव्हा त्याला सरळ शॉट मारू नको, असं सांगायचो. शाहरुख नेटमध्ये बॅटिंग करत असताना मी त्याला बॉलिंग करणार नाही. आता माझं वय झालं आहे, तसंच शरीरही साथ देत नाही,' असं कुंबळे म्हणाले.

कुंबळेकडून होत असलेलं कौतुक पाहून शाहरुखही खूश झाला. कुंबळेनी हे बोलणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पंजाबच्या टीममधल्या सहकाऱ्यांशी मी खूप बोलतो, यातून मला शिकण्याची संधी मिळते, असं वक्तव्य शाहरुखने केलं.

लिलावात शाहरुखला मोठी किंमत

शाहरुख स्थानिक क्रिकेटमध्ये तामीळनाडूकडून खेळतो. यावेळच्या आयपीएल लिलावात त्याला पंजाब किंग्सने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये होती, म्हणजेच पंजाबने शाहरुखसाठी 20 पट जास्त किंमत मोजली. शाहरुखला विकत घेण्यासाठी पंजाब, दिल्ली आणि बँगलोर यांच्यात जोरदार स्पर्धा झाली.

पंजाबच्या टीमने लिलावात विकत घेतल्यानंतरही शाहरुख खूश झाला होता. 'लिलाव 3 वाजता सुरू झाला तेव्हा मी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सराव करत होतो. लिलावात जेव्हा माझं नाव येईल तेव्हा मला सांग, असं मी फिजियोला सांगितलं होतं. पण सराव करत असताना माझं नाव आलं नाही. सराव संपवून मी बसने हॉटेलमध्ये गेलो, तेव्हा लिलावात माझं नाव पुकारलं गेलं आणि माझ्या छातीत धडधडायला लागलं,' असं शाहरुख म्हणाला होता.

तामीळनाडू प्रीमियर लीगमधल्या चांगल्या कामगिरीनंतरच शाहरुखवर आयपीएल फ्रॅन्चायजींची नजर होती. शाहरुखने 31 टी-20 मॅचमध्ये 131 च्या स्ट्राईक रेटने 293 रन केले. बॅटिंगसोबतच शाहरुख ऑफ स्पिन बॉलिंगही करतो.

Published by: Shreyas
First published: April 5, 2021, 6:13 PM IST

ताज्या बातम्या