चेन्नई, 18 एप्रिल : श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनला (Muthiah Muralidharan) चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकारामुळे मुरलीधरनवर एन्जियोप्लास्टी करण्यात आलली आहे. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात मुरलीवर शस्त्रक्रिया झाली आहे. इएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मुरलीच्या धमण्यांमध्ये ब्लॉक काढण्यासाठी हृदयात स्टेन्ट बसवण्यात आली आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट घेणारा मुरलीधरन डिस्चार्ज मिळाल्यानंतर लवकरच सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) टीममध्ये दिसेल. मुरलीधरन हा हैदराबाद टीमचा प्रशिक्षक आहे. आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात हैदराबादचा मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) पराभव झाला होता, यानंतर आता त्यांचा सामना बुधवारी पंजाबविरुद्ध (Punjab Kings) होणार आहे.
शनिवारी 17 एप्रिललाच मुरलीधरन 49 वर्षांचा झाला आहे. आयपीएलमध्ये येण्याआधी मुरलीधरनने श्रीलंकेतल्या डॉक्टरांशी त्याच्या हृदयात असलेल्या ब्लॉकेज बद्दल चर्चा केली होती. सुरुवातीला त्याच्या हृदयात स्टेन्ट टाकण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं, पण चेन्नईच्या अपोलो रुग्णालायने त्याला एन्जियोप्लास्टी करण्याचा सल्ला दिला, यानंतर लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुरलीधरनची प्रकृती आता चांगली असून तो लवकरच मैदानात येईल, असा विश्वास सनरायजर्सचे सीईओ शन्मुगानंथन यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितलं.
महिन्याच्या सुरुवातीला मुरलीधरन आयपीएलसाठी हैदराबादमध्ये आला होता आणि 7 दिवस क्वारंटाईन झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.