चेन्नई, 6 एप्रिल: आयपीएलचा (IPL 2021) यंदाचा मोसम सुरू व्हायला तीन दिवस शिल्लक असतानाच मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे. भारताचे माजी विकेट कीपर आणि मुंबई इंडियन्सचे टॅलेंट स्काऊट किरण मोरे (Kiran More) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 58 वर्षांचे किरण मोरे मुंबई इंडियन्सने विकेट कीपिंग सल्लागारही आहेत. किरण मोरे यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत, तसंच त्यांनी स्वत:ला विलगिकरणात ठेवलं आहे. मुंबई इंडियन्स आणि किरण मोरे यांनी बीसीसीआयने दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन केलं आहे. मुंबई इंडियन्सची वैद्यकीय टीम किरण मोरेंच्या तब्येतीची काळजी घेत आहे, तसंच आम्ही बीसीसीआयचे नियम पाळत आहोत, असं ट्वीट मुंबई इंडियन्सने केलं आहे.
Official Statement:
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2021
Mumbai Indians’ scout and wicket keeping consultant Mr. Kiran More has tested positive for Covid-19. #MumbaiIndians #MI #OneFamily (1/3) pic.twitter.com/Szoweg0MrZ
किरण मोरे यांच्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल (Axar Patel), बँगलोरचा देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनाही कोरोनाची लागण झाली. हे दोन्ही खेळाडू आता विलगिकरणात आहेत. देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढत आहे.

)







