जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: चेन्नईच्या गरमीमध्ये अशी तयारी करत आहेत Bumrah - Arjun

IPL 2021: चेन्नईच्या गरमीमध्ये अशी तयारी करत आहेत Bumrah - Arjun

IPL 2021: चेन्नईच्या गरमीमध्ये अशी तयारी करत आहेत Bumrah - Arjun

गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या 14 व्या मोसमाची (IPL 2021) सुरूवात 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (RCB) मॅचने करेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 6 एप्रिल : गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या 14 व्या मोसमाची (IPL 2021) सुरूवात 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (RCB) मॅचने करेल. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर या दोन्ही टीम यावर्षीचा पहिला सामना खेळतील. आयपीएलच्या नव्या मोसमासाठी सगळ्या टीमनी सरावाला सुरूवात केली आहे. आयपीएलची सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू नेटमध्ये जोरदार सराव करत आहेत. चेन्नईच्या गरमीमध्ये खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून खेळाडूंच्या सरावाचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिस लीन, कृणाल पांड्या आणि इशान किशन सराव करताना दिसत आहेत. आयपीएलच्या या मोसमात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबईकडून खेळणार आहे. मुंबईने अर्जुनला लिलावात 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. गरमीमध्ये आजचा दिवस चांगला होता, असं अर्जुन तेंडुलकर म्हणाला. तसंच या उकाड्यात चार ओव्हर टाकल्या तरी 10-15 ओव्हर टाकल्यासारखं वाटतं, अशी प्रतिक्रिया लेग स्पिनर राहुल चहरने (Rahul Chahar) दिली.

जाहिरात

सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मागच्या मोसमात मुंबईने फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटने पराभव केला होता. मुंबईची टीम रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंदुलकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात