मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : धोनी आयपीएल निवृत्तीवर बोलला, CSK सोबतच्या अखेरच्या सामन्याबाबत म्हणाला...

IPL 2021 : धोनी आयपीएल निवृत्तीवर बोलला, CSK सोबतच्या अखेरच्या सामन्याबाबत म्हणाला...

एमएस धोनची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2021 च्या (IPL 2021) प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचणारी पहिली टीम ठरली.

एमएस धोनची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2021 च्या (IPL 2021) प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचणारी पहिली टीम ठरली.

एमएस धोनची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2021 च्या (IPL 2021) प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचणारी पहिली टीम ठरली.

दुबई, 5 ऑक्टोबर : एमएस धोनची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2021 च्या (IPL 2021) प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचणारी पहिली टीम ठरली. मागच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये स्थान न मिळाल्यामुळे एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली. आता खुद्द एमएस धोनीनेच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धोनीच्या वक्तव्यावरून त्याला पुढची आयपीएल स्पर्धा खेळायची आहे, असंच दिसत आहे. 15 ऑगस्ट 2019 ला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

एमएस धोनीने इंडिया सिमेंट्सला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांशी संवाद साधला तेव्हा त्याने निवृत्तीवर भाष्य केलं. 'जेव्हा अलविदा करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि मला सीएसकेकडून खेळताना बघू शकता. तुम्हाला मला अलविदा करण्याची संधी मिळेल. आम्ही चेन्नईमध्ये येऊ आणि अखेरची मॅच खेळू, अशी अपेक्षा आहे. सगळ्या चाहत्यांनाही भेटू,' असं भावुक वक्तव्य धोनीने केलं.

2019 नंतर धोनी चेन्नईकडून खेळू शकलेला नाही. मागच्या मोसमात आयपीएलच्या सगळ्या मॅच युएईमध्ये झाल्या होत्या, तर या मोसमाचे पहिले 29 सामने भारतात झाले, पण कोणत्याच टीमला त्यांच्या घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळाली नाही.

सीएसकेला जिंकवून दिल्या 5 ट्रॉफी

एमएस धोनीने आपल्या कॅप्टन्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्सला 5 टी-20 ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत, यात 3 आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफीचा समावेश आहे. 2018 नंतर चेन्नई सुपर किंग्सला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे यावेळी धोनी पुन्हा एकदा फायनल जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. आयपीएलनंतर धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मेंटर म्हणून काम करेल.

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने या मोसमात 10 विजयांसह 20 पॉईंट्स मिळवले आहेत. दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर आहे, याशिवाय आरसीबीनेही प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे.

First published:
top videos

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni