जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : धोनीच्या पदरी पुन्हा निराशा, 6 वर्षात पहिल्यांदाच केला नकोसा विक्रम

IPL 2021 : धोनीच्या पदरी पुन्हा निराशा, 6 वर्षात पहिल्यांदाच केला नकोसा विक्रम

IPL 2021 : धोनीच्या पदरी पुन्हा निराशा, 6 वर्षात पहिल्यांदाच केला नकोसा विक्रम

आयपीएलच्या नव्या मोसमात (IPL 2021) एमएस धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्स (CSK) मागच्यावर्षाची कामगिरी विसरून पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे, पण पहिल्याच सामन्यात धोनीच्या पदरी निराशा आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल : आयपीएलच्या नव्या मोसमात (IPL 2021) एमएस धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्स (CSK) मागच्यावर्षाची कामगिरी विसरून पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे, पण पहिल्याच सामन्यात धोनीच्या पदरी निराशा आली आहे. दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यात सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला धोनी शून्य रनवर आऊट झाला. आवेश खानने धोनीला दुसऱ्याच बॉलवर बोल्ड केलं. आयपीएल इतिहासामध्ये धोनी पाचव्यांदा शून्य रनवर आऊट झाला. याआधी 6 वर्षांपूर्वी 2015 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनी पहिल्याच बॉलला माघारी परतला होता. तर 2010 साली तो राजस्थान आणि दिल्लीविरुद्धच शून्य रनवर आऊट जाला होता. या सामन्यात धोनी शून्य रनवर आऊट झाला तरी चेन्नईला फारसा फरक पडला नाही, कारण दोन वर्षांनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनाने (Suresh Raina) आक्रमक अर्धशतक केलं. रैनाने 36 बॉलमध्ये 54 रन केले. रैनाच्या या खेळीमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. रैनाशिवाय मोईन अलीने 36 रन, अंबाती रायुडूने 23 रन, रविंद्र जडेजाने 26 रन आणि सॅम करनने 34 रन केले. आयपीएलच्या मागच्या मोसमात सुरेश रैना टीमसोबत युएईला गेला होता, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच तो भारतात परतला. यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. चेन्नई टीमचे मालक एन.श्रीनिवासन यांनीही सुरेश रैनावर टीका केली होती, पण हा वाद मिटवून रैना पुन्हा चेन्नईच्या टीममध्ये यंदा दाखल झाला. चेन्नईच्या टीमला मागच्या मोसमात सुरेश रैनाची कमतरता चांगलीच जाणवली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्ले-ऑफ गाठता आली नाही. पॉईंट्स टेबलमध्येही ते सातव्या क्रमांकावर राहिले. चेन्नईच्या टीमने आतापर्यंत धोनीच्या नेतृत्वात तीनवेळा आयपीएल जिंकली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात