जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : लिलावात नाकारलं तरी मॅकलॅनघनचं मुंबईवर प्रेम, अपयश वर्तवणाऱ्याला सुनावलं

IPL 2021 : लिलावात नाकारलं तरी मॅकलॅनघनचं मुंबईवर प्रेम, अपयश वर्तवणाऱ्याला सुनावलं

IPL 2021 : लिलावात नाकारलं तरी मॅकलॅनघनचं मुंबईवर प्रेम, अपयश वर्तवणाऱ्याला सुनावलं

आयपीएलच्या यंदाच्या लिलावात (IPL 2021 Auction) न्यूझीलंडचा फास्ट बॉलर मिचेल मॅकलेनघनला (Mitchell Mcclenaghan) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लिलावात विकत घेतलं नाही. पण त्याचं मुंबईच्या टीमवरचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 23 एप्रिल: आयपीएलच्या यंदाच्या लिलावात (IPL 2021 Auction) न्यूझीलंडचा फास्ट बॉलर मिचेल मॅकलेनघनला (Mitchell Mcclenaghan) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लिलावात विकत घेतलं नाही. पण त्याचं मुंबईच्या टीमवरचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही. मुंबईच्या अपयशाचं भाकीत करणाऱ्या एका ट्रोलरला मॅकलॅनघनने सुनावलं आहे. 2015 पासून मिचेलने आयपीएलमध्ये करियर सुरू केलं, पहिल्यापासून तो मुंबईच्याच टीममध्ये होता. या 6 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्याने 56 सामन्यांमध्ये 8.49 च्या सरासरीने 71 विकेट घेतल्या. मिचेल मॅकलेनघन त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होता, तेव्हा एका यूजरने मुंबई यंदा पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिल, असं भाकीत वर्तवलं. त्यावर तू मुका आहेस का? असा सवाल मॅकलॅनघनने विचारला. तसंच मुंबई इंडियन्स जर शेवटच्या क्रमांकावर राहिली, तर टीमकडून मिळालेल्या सगळ्या वस्तूंचा आपण समाजकार्यासाठी लिलाव करू, असंही मॅकलेनघन म्हणाला.

जाहिरात

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी ठीकठाक झाली आहे. बँगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर कोलकाता आणि हैदराबादविरुद्ध मुंबईने विजय मिळवला, तर दिल्लीविरुद्ध टीमच्या पदरी निराशा आली. मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या मोसमांमध्ये मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता लागोपाठ तीनवेळा आयपीएल जिंकण्याची संधी रोहित शर्माच्या टीमला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात