मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएलच्या या मोसमात 4 मोठे बदल, कोणाला फायदा होणार?

IPL 2021 : आयपीएलच्या या मोसमात 4 मोठे बदल, कोणाला फायदा होणार?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) वेळापत्रकाची बीसीसीआयने (BCCI) घोषणा केली आहे. यावर्षी 9 एप्रिलला आयपीएलला सुरूवात होईल, तर 30 मे रोजी फायनल खेळवली जाईल.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) वेळापत्रकाची बीसीसीआयने (BCCI) घोषणा केली आहे. यावर्षी 9 एप्रिलला आयपीएलला सुरूवात होईल, तर 30 मे रोजी फायनल खेळवली जाईल. नेहमीप्रमाणे यावर्षीही चाहत्यांना रोमांचक सामने बघायला मिळतील, यात काही शंका नाही. तब्बल दोन वर्षांनंतर भारतामध्ये पुन्हा आयपीएल होत आहे. मागच्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे युएईमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

न्यूट्रल ठिकाणी सामने

यावेळची आयपीएल जरी भारतात होत असली तरी कोणत्याच टीमला त्यांच्या घरच्या मैदानात खेळता येणार नाही. या मोसमातले सगळे सामने न्यूट्रल ठिकाणी खेळवले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याच टीमला घरच्या मैदानात खेळायचा फायदा मिळणार नाही.

डबल हेडर लवकर सुरू होणार

आयपीएल 2021 मध्ये पहिल्यांदाच डबल हेडरचे सामने लवकर सुरू होणार आहेत. दुपारची मॅच 3.30 वाजता तर रात्रीची मॅच 7.30 वाजता सुरू होईल. याआधी दुपारची मॅच 4 वाजता आणि रात्रीची मॅच 8 वाजता सुरू व्हायची.

मैदानात प्रेक्षक नाही

भारतात पहिल्यांदाच आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत. पण स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली जाऊ शकते, असं वृत्त आहे. त्या ठिकाणच्या कोरोनाच्या परिस्थितीवर हा निर्णय घेतला जाणार आहे.

जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर फायनल

आतापर्यंत गतविजेत्या टीमच्या घरच्या मैदानात आयपीएलचा पहिला सामना आणि फायनल खेळवली जायची. मागच्या वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकल्यामुळे वानखेडे स्टेडियमवर या दोन्ही मॅच होणं अपेक्षित होतं, पण यंदा मात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल खेळवली जाणार आहे. हे स्टेडियम जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे. एकाच वेळी याठिकाणी 1 लाख 10 हजार माणसं बसू शकतात.

First published:

Tags: BCCI, Cricket, IPL 2021, Season 14, Sports