मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 च्या लीग मॅच मुंबईत, तर प्ले ऑफचे सामने या ठिकाणी!

IPL 2021 च्या लीग मॅच मुंबईत, तर प्ले ऑफचे सामने या ठिकाणी!

आयपीएलचा 2021 (IPL 2021 Auction) सालचा लिलाव झाल्यानंतर आता यंदाची स्पर्धा भारतात होणार का भारताबाहेर? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

आयपीएलचा 2021 (IPL 2021 Auction) सालचा लिलाव झाल्यानंतर आता यंदाची स्पर्धा भारतात होणार का भारताबाहेर? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

आयपीएलचा 2021 (IPL 2021 Auction) सालचा लिलाव झाल्यानंतर आता यंदाची स्पर्धा भारतात होणार का भारताबाहेर? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मुंबई, 19 फेब्रुवारी : आयपीएलचा 2021 (IPL 2021 Auction) सालचा लिलाव झाल्यानंतर आता यंदाची स्पर्धा भारतात होणार का भारताबाहेर? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच आता यंदाची आयपीएल भारतातच आयोजित होईल, तसंच लीग स्टेजच्या मॅच मुंबईत (Mumbai) आणि प्ले ऑफचे सामने अहमदाबादमध्ये (Motera Stadium Ahmedabad) होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मालक पार्थ जिंदाल (Parth Jindal) यांनी गुरुवारी झालेल्या लिलावानंतर याबाबतचे संकेत दिले. पार्थ जिंदाल म्हणाले, 'जे मी बघत आहे आणि ऐकत आहे, त्यानुसार जर इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येऊ शकते, जर आयएसएलच्या सगळ्या मॅच गोव्यामध्ये होऊ शकतात, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सगळ्या शहरांमध्ये होऊ शकतात, तर मग आयपीएल परदेशात खेळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला वाटतं आयपीएल यावेळी भारतातच होईल.'

'लीग स्टेजच्या मॅच एका ठिकाणी, तसंच प्ले ऑफचे सामने दुसरीकडे होऊ शकतात,' अशी प्रतिक्रिया पार्थ जिंदाल यांनी दिली. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार मुंबईमध्ये लीग स्टेजच्या मॅच होऊ शकतात, कारण तिकडे तीन ग्राऊंड आहेत, तसंच सरावासाठी गरजेच्या असलेल्या सुविधाही आहेत. तसंच अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्य नॉकआऊट सामन्यांचं आयोजन होऊ शकतं. मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईमध्ये डी.वाय.पाटील स्टेडियम उपलब्ध आहेत.

दिल्लीला फायदा?

लीग स्टेजच्या सगळ्या मॅच मुंबईमध्ये झाल्या, तर याचा फायदा दिल्लीच्या टीमला होऊ शकतो, असं पार्थ जिंदाल यांना वाटतं. कारण दिल्लीच्या टीममध्ये श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे हे सगळे खेळाडू मुंबईचे आहेत. सोबतच स्टीव्ह स्मिथची बॅटिंग मुंबईच्या खेळपट्टीवर फायद्याची ठरू शकते.

First published:
top videos