• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सनरायजर्स हैदराबादसमोर 126 धावांचे सोपे आव्हान; जेसन होल्डरचा पंजाबवर 'होल्ड'

सनरायजर्स हैदराबादसमोर 126 धावांचे सोपे आव्हान; जेसन होल्डरचा पंजाबवर 'होल्ड'

पंजाबच्या संघाने सनरायजर्स हैदराबादसमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय हैदराबादच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

 • Share this:
  आबुधाबी, 25 सप्टेंबर : आयपीएलच्या रणसंग्रामात आज सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या संघाने सनरायजर्स हैदराबादसमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय हैदराबादच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पंजाबचा कर्णधार के एल राहुल (21 धावा) आणि एडन मार्कराम (27 धावा) या दोघांच्या व्यतिरिक्त पंजाबचे शेर सनरायजर्स विरूद्ध फलंदाजी करताना ढेर झाल्याचे दिसून आले. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. होल्डरशिवाय संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, अब्दुल सामद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पंजाबकडून संथ फलंदाजी करण्यात आली. कर्णधार केएल राहुलने 21 धावा काढताना 21 चेंडू खेळले त्यामध्ये तीन चौकारांचा समावेश आहे. तर एडननेही 27 धावांसाठी 32 चेंडू खेळले त्यामध्ये 2 चौकार लगावले. हे वाचा - IPL 2021, DC vs RR: नंबर 1 बॉलर 5 वर्षांनी मैदानात, सर्वात महागड्या खेळाडूच्या जागी संधी संघ असे - सनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा (w), केन विल्यमसन (c), मनीष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद हे वाचा - DC vs RR : आयपीएलच्या इतिहासात 10 वर्षानंतर राजस्थानच्या नावे असा लाजिरवाणा रेकॉर्ड पंजाब किंग्स : केएल राहुल (c & wk), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग
  Published by:News18 Desk
  First published: