मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : धोनीच्या वयावर हार्दिक पांड्याची पोस्ट, चाहते म्हणतात...

IPL 2021 : धोनीच्या वयावर हार्दिक पांड्याची पोस्ट, चाहते म्हणतात...

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा सध्या आयपीएलची (IPL 2021) तयारी करत आहे. चेन्नई सुपरकिंग्जला (CSK) तीनवेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या एमएस धोनीने मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 मार्च : महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा सध्या आयपीएलची (IPL 2021) तयारी करत आहे. चेन्नई सुपरकिंग्जला (CSK) तीनवेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या एमएस धोनीने मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या टीमला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता आणि टीम सातव्या क्रमांकावर राहिली होती.

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. माहीभाई टाइम ट्रॅव्हलिंगही करायला लागला का? असा प्रश्न हार्दिक पांड्याने विचारला. हार्दिक पांड्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 'माही भाई काहीही करू शकतात. धोनीवर जे जळतात त्यांनी बाजूला व्हावं,' असे त्याचे चाहते म्हणाले आहेत.

धोनीचा आयपीएलचा हा मोसम शेवटचा असू शकतो. सध्या तो 39 वर्षांचा आहे, त्यामुळे यावेळी तो टीमला आणखी एक ट्रॉफी देण्यासाठी मैदानात उतरेल. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताला तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नईचा पहिला सामना 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.

चेन्नईची टीम

महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड़, सुरेश रैना, सॅम करन, जॉश हेजलवूड, इमरान ताहिर, फाफ डुप्लेसी, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, कर्ण शर्मा, अंबाती रायडू, मिचेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, नारायण जगदीशन, केएल आसिफ, लुंगी एनगिडी, साई किशोर, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, एम हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा, के हरी निशांत

First published:

Tags: Cricket news, Hardik pandya, IPL 2021, MS Dhoni