मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : KKR विरुद्धच्या मॅचआधी मुंबईसाठी खूशखबर, महत्त्वाचा खेळाडू उपलब्ध

IPL 2021 : KKR विरुद्धच्या मॅचआधी मुंबईसाठी खूशखबर, महत्त्वाचा खेळाडू उपलब्ध

आयपीएलमध्ये (IPL 2021) मंगळवारी मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत (Mumbai Indians vs KKR) होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर आहे. टीमचा महत्त्वाचा खेळाडू क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) या सामन्यासाठी उपलब्ध आहे.

पुढे वाचा ...

चेन्नई, 12 एप्रिल : आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात बँगलोरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs RCB) पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी मैदानात उतरेल. मंगळवारी मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत (KKR) होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर आहे. टीमचा महत्त्वाचा खेळाडू क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) या सामन्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन झहीर खान (Zaheer Khan) याने दिली.

पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईने यावर्षाच्या स्पर्धेची सुरुवात बँगोलरविरुद्धच्या सामन्याने केली. अटीतटीच्या या मॅचमध्ये मुंबईचा शेवटच्या बॉलवर दोन विकेटने पराभव झाला. डिकॉकच्या गैरहजेरीमध्ये क्रिस लीन (Chris Lynn) मुंबईसाठी मैदानात उतरला. लिनचा मुंबई इंडियन्सकडून हा पहिलाच सामना होता. आयपीएलच्या मागच्या मोसमात त्याला एकाही मॅचसाठी संधी मिळाली नाही.

क्विंटन डिकॉक हा दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातल्या सीरिजमध्ये खेळत होता. ही सीरिज अर्ध्यात सोडून डिकॉक आयपीएल खेळण्यासाठी भारतात परतला, पण नियमानुसार त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं, त्यामुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही.

डिकॉकचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे, तसंच त्याने रविवारी टीमसोबत सराव केला. नव्या मोसमासाठी तो तयार आहे. मंगळवारच्या सामन्यासाठीही तो उपलब्ध आहे, असं झहीर खानने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं.

डिकॉकच्या गैरहजेरीत क्रिस लीनने चांगली कामगिरी केली. लीनने 49 रनची खेळी केली, तरी मुंबईला पराभवाचा धक्का बसला. बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबईला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 रन केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फॉर्ममध्ये होता, त्याने सुरुवातीलाच एक सिक्स आणि फोर मारली, पण 19 रनवर तो रन आऊट झाला.

मुंबईची अवस्था 16 व्या ओव्हरमध्ये 135-3 अशी होती, पण हर्षल पटेलच्या (Harshal Patel) 5 विकेटमुळे त्यांची बॅटिंग गडगडली. मुंबईने ठेवलेलं 160 रनचं आव्हान बँगलोरने शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. एबी डिव्हिलियर्सने (Ab de Villiers) 27 बॉलमध्ये 48 रनची खेळी केली.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Mumbai Indians, Quinton de kock, Zaheer Khan