• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022 मध्ये वॉर्नर या टीमकडून खेळणार! जर्सी घालून शेयर केला PHOTO, काही वेळात डिलीट

IPL 2022 मध्ये वॉर्नर या टीमकडून खेळणार! जर्सी घालून शेयर केला PHOTO, काही वेळात डिलीट

सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यातल्या नात्याची चर्चा या वर्षीच्या आयपीएलच्या (IPL 2021) संपूर्ण मोसमात झाली. खराब फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरची पहिले कॅप्टन्सी काढण्यात आली यानंतर त्याला टीममधूनही डच्चू देण्यात आला.

 • Share this:
  दुबई, 16 ऑक्टोबर : सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यातल्या नात्याची चर्चा या वर्षीच्या आयपीएलच्या (IPL 2021) संपूर्ण मोसमात झाली. खराब फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरची पहिले कॅप्टन्सी काढण्यात आली यानंतर त्याला टीममधूनही डच्चू देण्यात आला. एवढच नाही तर हैदराबादच्या टीमने वॉर्नरचा अपमान केला आणि त्याच्याशी गैरवर्तन केल्याचे आरोपही चाहत्यांनी केले. टीममधून डच्चू मिळाल्यानंतर वॉर्नर टीमच्या डग आऊटमध्येही दिसला नाही. स्टेडियममध्ये बसून वॉर्नरने हैदराबादच्या टीमला पाठिंबा दिला. पुढच्या मोसमात आपण हैदराबादकडून खेळणार नसल्याचे संकेत वॉर्नरने दिले. आयपीएल 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचा हा आक्रमक खेळाडू नेमका कोणत्या टीमकडून खेळणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच आयपीएल 2021 च्या फायनलआधी वॉर्नरने एक फोटो शेयर केला, त्यावरूनही बरीच चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल फायनलदरम्यान वॉर्नरने आपल्या मुलीसोबत चेन्नई सुपर किंग्सची (CSK) जर्सी घातलेला एक फोटो शेयर केला. वॉर्नरचा हा फोटो मॉर्फ केलेला होता. या फोटोमध्ये वॉर्नरने मुलीला खांद्यावर घेतलं आहे. हा खरा फोटो हैदराबादच्या जर्सीमधला होता, पण त्याने फोटो मॉर्फ करून त्यावर चेन्नईची जर्सी लावली. वॉर्नरने अवघ्या काही मिनिटांमध्येच हा फोटो डिलीट केला. फोटो डिलीट केल्यानंतर वॉर्नरने त्याच्या मुलीसोबतचा खरा फोटो टाकला आणि माफीही मागितली. हा खरा फोटो आहे, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं.
  Published by:Shreyas
  First published: