नवी दिल्ली, 28 एप्रिल : दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चित्त्यापेक्षाही चपळ फिल्डिंग क्रिकेट रसिकांनी अनेकवेळा अनुभवली आहे. आयपीएलच्या (IPL 2021) हैदराबाद आणि चेन्नई (SRH vs CSK) यांच्या सामन्यात फाफ डुप्लेसिसची (Faf du Plessis) अफाट फिल्डिंग बघायला मिळाली. बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या डुप्लेसिसने सुपरमॅनसारखी उडी मारत मनिष पांडेचा (Manish Pandey) कॅच पकडला. डुप्लेसिसने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ अवघ्या काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला. हैदराबादची बॅटिंग सुरू असताना 18 व्या ओव्हरमध्ये मनिष पांडे धोकादायक वाटत होता, पण लुंगी एनगिडीच्या (Lungi Ngidi) बॉलिंगवर ओव्हरच्या पाचव्या बॉलवर मनिष पांडेने लॉन्ग ऑन आणि डीप मीड विकेटच्या मधून सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण लॉन्ग ऑनवर उभा असलेला फाफ डुप्लेसिस मिड विकेटच्या दिशेने धावत गेला आणि उडी मारून मनिष पांडेचा कॅच पकडला.
FaF Duplesis 🙏🙏💥🔥🔥🔥🔥#CSK#CSKvSRH#CSKvsSRH
— Raghavan (@vijayraghavan77) April 28, 2021
https://t.co/iP6HdP08SV
46 बॉलमध्ये 61 रनची खेळी करून मनिष पांडे माघारी परतला. मनिष पांडेच्या या खेळीमध्ये 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. या मोसमात खराब कामगिरीमुळे सुरुवातीच्या काही मॅचनंतर मनिष पांडेला डच्चू देण्यात आला होता, यानंतर चेन्नईविरुद्ध त्याला पुन्हा संधी देण्यात आली. मनिष पांडेनेही त्याला दिलेल्या डच्चूचा बदला घेतला. फाफने वाचवले सर्वाधिक रन आयपीएल 2018 पासून आतापर्यंत फाफ डुप्लेसिसने फिल्डिंगमध्ये सर्वाधिक रन वाचवले आहेत. डुप्लेसिसने आयपीएलच्या 4 मोसमात 36 रन, मनिष पांडेने 34 रन, आंद्रे रसेलने 31 रन, कृणाल पांड्याने 28 रन आणि ग्लेन मॅक्सवेलने 26 रन वाचवले आहेत.

)







