मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : ...म्हणून आयपीएलमधून अखेरच्या क्षणी माघार घेतली, इंग्लंडच्या खेळाडूने सांगितलं खरं कारण

IPL 2021 : ...म्हणून आयपीएलमधून अखेरच्या क्षणी माघार घेतली, इंग्लंडच्या खेळाडूने सांगितलं खरं कारण

भारत आणि इंग्लंड यांच्यात मॅनचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द करण्यात आली, यानंतर इंग्लंडचे तीन खेळाडू जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow), डेव्हिड मलान (David Malan) आणि क्रिस वोक्स (Chris Woakes) यांनी आयपीएल 2021 (IPL 2021) मधून माघार घेतली.

पुढे वाचा ...

लंडन, 14 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यात मॅनचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द करण्यात आली, यानंतर मोठा वाद निर्माण झाला. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि इंग्लिश मीडियाने पाचवी टेस्ट रद्द होण्यामागे आयपीएल (IPL 2021) कारण असल्याचे आरोप केले. पाचवी टेस्ट रद्द झाल्यावर इंग्लंडचे तीन खेळाडू जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow), डेव्हिड मलान (David Malan) आणि क्रिस वोक्स (Chris Woakes) यांनी आयपीएल 2021 मधून माघार घेतली. मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्याचा बदला म्हणून हे तिघांनी अखेरच्या क्षणी आपण आयपीएल खेळणार नसल्याचं सांगितलं, असंही बोललं गेलं. यावर आता क्रिस वोक्स याने प्रतिक्रिया दिली आहे. मला आयपीएल खेळायचं होतं, पण टी-20 वर्ल्ड कपसाठी खूप कमी वेळ होता, असं वोक्स म्हणाला. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

गार्डियनशी बोलताना वोक्स म्हणाला, 'टी-20 वर्ल्ड कप आणि एशेसमुळे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खूप कमी वेळ होता. मला आयपीएल खेळायचं होतं, पण यासाठी मला वेळ द्यावा लागला असता, पण हा वेळ मी कुटुंबासोबत घालवण्याचा निर्णय घेतला. टी-20 वर्ल्ड कपमध्येही मला स्थान मिळालं आहे. आयपीएलचं वेळापत्रकही बदलण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी मला याबाबत काहीही माहिती नव्हतं.'

'टी-20 वर्ल्ड कपनंतर बराच काळ एशेस सीरिज चालणार आहे. कोरोनामुळे गोष्टी सामान्य राहिल्या नाहीत. पण हा मोसम रोमांचक असणार आहे. ऑस्ट्रेलियात आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला कडक क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे का नाही, हे आम्हाला माहिती नाही. येत्या काही दिवसांमध्ये आम्हाला याबाबत माहिती मिळेल,' असं वक्तव्य वोक्सने केलं. ऑस्ट्रेलियातल्या क्वारंटाईनच्या कडक नियमांमुळे इंग्लंडच्या खेळाडूंन एशेस न खेळण्याबाबतची भूमिका घेतली आहे. 8 डिसेंबरपासून एशेसला सुरुवात होणार आहे.

पाचवी टेस्ट आयपीएलमुळे रद्द झाल्याची टीका होत असतानाच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. खेळाडू कोरोनामुळे घाबरले होते, त्यामुळे अखेरच्या टेस्टमध्ये खेळाडूंनी माघार घ्यायाचा निर्णय घेतला. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर होती.

First published:
top videos

    Tags: India vs england, IPL 2021