मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 मध्ये धोनीला होणार मोठं नुकसान, पण CSK म्हणते टेन्शन नाही!

IPL 2021 मध्ये धोनीला होणार मोठं नुकसान, पण CSK म्हणते टेन्शन नाही!

कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) चं दुसरं सत्र सप्टेंबरमध्ये आयोजित केलं जाऊ शकतं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय (BCCI) युएईमध्ये (UAE) याचं आयोजन करेल.

मुंबई, 28 मे : कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) चं दुसरं सत्र सप्टेंबरमध्ये आयोजित केलं जाऊ शकतं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय (BCCI) युएईमध्ये (UAE) याचं आयोजन करेल. शनिवारी होणाऱ्या विशेष बैठकीत बीसीसीआय याबाबत निर्णय घेईल. पण आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडचे खेळाडू सहभागी होणार नाहीत, असं वृत्त आहे. ही बातमी अनेक टीमसाठी चिंताजनक आहे, कारण अनेक इंग्लिश खेळाडू आयपीएल टीमचं संतुलन बनवतात. चेन्नई सुपरकिंग्स (CSK) मात्र आम्ही यामुळे चिंतित नाही, असं सांगत आहेत.

इंग्लंडच्या खेळाडूंचं न खेळणं आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही, असं सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाले.

'जर इंग्लंड आपल्या खेळाडूंना पाठवत नसेल, तर आम्ही काहीही करू शकत नाही. आमचे दोन महत्त्वाचे खेळाडू येणार नाहीत, पण याबाबत आम्हाला अजून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही,' अशी प्रतिक्रिया काशी विश्वनाथन यांनी दिली. इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असं इंग्लंड टीमचे मॅनेजिंग डायरेक्टर एश्ले जाईल्स म्हणाले. आम्ही खेळाडूंना आराम देऊ, पण आयपीएल खेळण्यासाठी पाठवणार नाही, असं जाईल्स यांनी सांगितलं.

चेन्नईच्या टीममध्ये दोन महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडचे आहेत. ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) आणि मोईन अली (Moeen Ali) चेन्नईच्या टीममध्ये आहेत. चेन्नईने मोईन अलीला 7 कोटी रुपयांना तर सॅम करनला 5.5 कोटी रुपयांना विकत घेतलं. मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येतो, त्याने या मोसमात 6 सामन्यांमध्ये 157.25 च्या स्ट्राईक रेटने 206 रन केले. तसंच त्याने 6.16 च्या इकोनॉमी रेटने 5 विकेटही घेतल्या. तर सॅम करनने 7 मॅचमध्ये 9 विकेट मिळवल्या. जर हे दोन खेळाडू आले नाहीत, तर चेन्नईसमोर अडचणी उभ्या राहू शकतात.

First published:
top videos

    Tags: Cricket, Csk, IPL 2021, MS Dhoni