जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : लिलावात सर्वाधिक बोली, पण क्रिस मॉरिस नाही, हा आहे सगळ्यात महागडा खेळाडू!

IPL 2021 : लिलावात सर्वाधिक बोली, पण क्रिस मॉरिस नाही, हा आहे सगळ्यात महागडा खेळाडू!

IPL 2021 : लिलावात सर्वाधिक बोली, पण क्रिस मॉरिस नाही, हा आहे सगळ्यात महागडा खेळाडू!

दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर क्रिस मॉरिस (Chris Morris) हा आयपीएल लिलावातला (IPL Auction) सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावामध्ये क्रिस मॉरिसवर विक्रमी 16.25 कोटी रुपयांची बोली लागली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल : दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर क्रिस मॉरिस (Chris Morris) हा आयपीएल लिलावातला (IPL Auction) सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावामध्ये क्रिस मॉरिसवर विक्रमी 16.25 कोटी रुपयांची बोली लागली. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मॉरिसला एवढी किंमत घेऊन विकत घेतलं. आयपीएल लिलावात सगळ्यात मोठी बोली लागली असली, तरी तो आयपीएलमधला सगळ्यात महागडा खेळाडू नाही. आयपीएल लिलावात मॉरिसआधी युवराज सिंगवर (Yuvraj Singh) सर्वाधिक बोली लागली होती. 2015 च्या मोसमासाठी दिल्लीने युवराजला 16 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, तर पॅट कमिन्ससाठी (Pat Cummins) कोलकात्याने (KKR) मागच्या मोसात सर्वाधिक रक्कम मोजली होती. यंदाच्या मोसमासाठी मॉरिसने कमिन्स आणि युवराजला मागे टाकलं असलं तरी विराट कोहली (Virat Kohli) हा आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळणारा खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विराट कोहलीला प्रत्येक वर्षासाठ 17 कोटी रुपये देतं. 2018 साली आयपीएलचा मोठा लिलाव झाला. या लिलावामध्ये प्रत्येक टीमला 3 खेळाडू रिटेन करता आले. आयपीएलच्या नियमांनुसार टीमने पहिल्या पसंतीच्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या पसंतीच्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या पसंतीच्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये द्यावे लागणार होते, पण आरसीबीने विराट कोहलीला 17 कोटी रुपये दिले. यानंतर त्यांनी दुसरी पसंती एबी डिव्हिलियर्सला (Ab de Villiers) देऊन त्याला 11 कोटी रुपये दिले, तर त्यांनी आश्चर्यकारकरित्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) तिसऱ्या पसंतीचा खेळाडू ठेवल्यामुळे त्याच्यावर 1.75 कोटी रुपये खर्च केले. 2018 सालच्या आयपीएल मोसमापासून विराट कोहली प्रत्येक मोसमाला 17 कोटी रुपये कमवत आहे. आता पुढच्या वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होत असल्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात