• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा

IPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा

इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2021) बाहेर झाला आहे. घरी परतल्यानंतरही स्टोक्स आयपीएलचे सामने बघत आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 एप्रिल : इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2021) बाहेर झाला आहे. घरी परतल्यानंतरही स्टोक्स आयपीएलचे सामने बघत आहे. राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणारा बेन स्टोक्स रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (Dehli Capitals vs Punjab Kings) यांच्यातला सामना बघत होता. यानंतर त्याने कॉमेंटेटर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यावर निशाणा साधला. स्टोक्सने गावसकरांचं नाव न घेता त्यांच्या कॉमेंट्रीबाबत सोशल मीडियावर भाष्य केलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाबची टीम बॅटिंग करत होती, तेव्हा 11 व्या ओव्हरमध्ये गावसकर बाऊन्सरबद्दल बोलले. दिल्लीचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाला मयंक अग्रवालने या ओव्हरमध्ये दोन सिक्स मारल्या. यानंतर रबाडाने पंजाबचा कर्णधार केएल राहुलला बाऊन्सर बॉल टाकला, पण राहुलने या बॉलवर हूक मारला, त्यावेळी गावसकरांनी हा खराब बाऊन्सर असल्याची टीका केली. 'जर तुम्हाला बाऊन्सर टाकायचा असेल, तर तो ऑफ स्टम्पच्या वरती असला पाहिजे,' असं गावसकर म्हणाले. यानंतर बेन स्टोक्सने एक ट्वीट केलं. रिप्लेमध्ये बॉल ऑफ स्टम्पच्या वरती असल्याचं दिसत होतं, असं स्टोक्स म्हणाला. सोबतच त्याने डोक्याला हात मारल्याची इमोजीही पोस्ट केली. स्टोक्सच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेक मीम व्हायरल झाले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा 6 विकेटने पराभव केला. केएल राहुलने 61 रन तर मयंक अग्रवालने 69 रन केले, ज्यामुळे पंजाबला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 195 रनपर्यंत मजल मारता आली. दिल्लीने हे आव्हान 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पूर्ण केलं. शिखर धवनने 92 रनची खेळी केली, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. दिल्लीचा 3 सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे, त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. मुंबई इंडियन्सनेही एवढ्याच मॅच जिंकल्या असल्या तरी दिल्लीचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते मुंबईच्या पुढे आहेत.
  Published by:Shreyas
  First published: