जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरही उपलब्ध, एवढी आहे बेस प्राईज

IPL 2021 : आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरही उपलब्ध, एवढी आहे बेस प्राईज

IPL 2021 : आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरही उपलब्ध, एवढी आहे बेस प्राईज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar), फिक्सिंगनंतरच्या बंदीवासातून परतलेला फास्ट बॉलर एस. श्रीसंत (S. Sreesanth) आणि टीम इंडियाची नवी वॉल चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे या लिलावाचे मुख्य आकर्षण असतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 फेब्रुवारी : या वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2021) 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे. या लिलावासाठी खेळाडूंची नावनोंदणी करण्याची मुदत शुक्रवारी संपली आहे. यंदा एकूण 813 भारतीय आणि 283 विदेशी अशा एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar), फिक्सिंगनंतरच्या बंदीवासातून परतलेला फास्ट बॉलर एस. श्रीसंत (S. Sreesanth) आणि टीम इंडियाची नवी वॉल चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे या लिलावाचे मुख्य आकर्षण असतील. अर्जुन पहिल्यांदाच सहभागी अर्जुन तेंडुलकर यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत मुंबईकडून खेळला होता. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र झाला आहे. मुंबईच्या या ऑल राऊंडरची 20 लाख रुपये बेस प्राइज आहे. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयकॉन होता. त्यामुळे त्याचे नाव कधीही ऑक्शन टेबलवर आले नाही. आता अर्जुनला खरेदी करण्यासाठी कोणती टीम बोली लावणार याची उत्सुकता असेल. आयपीएल स्पर्धेतच स्पॉट फिक्सिंग (Sport Fixing) केल्याच्या प्रकरणात 7 वर्षांची बंदीची शिक्षा सहन केलेल्या एस. श्रीसंतनं देखील यंदा नोंदणी केली आहे. श्रीसंतची 75 लाख रुपये बेस प्राइज आहे. टीम इंडियाची नवी वॉल असलेल्या चेतेश्वर पुजाराची 50 लाख तर सिडनी टेस्टचा हिरो हनुमा विहारीची बेस प्राइज 1 कोटी रुपये आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आणि इंग्लंडचा कॅप्टन जो रुट यांनी या लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या देशाचे किती खेळाडू सहभागी? IPL 2021 साठी होणाऱ्या लिलावाकरता विदेशी खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजच्या सर्वात जास्त खेळाडूंनी नोंदणी केली आहे. वेस्ट इंडिजचे 56 खेळाडू नोंदणीसाठी उपलब्ध असतील. ऑस्ट्रेलियाचे 42, दक्षिण आफ्रिका 38, श्रीलंका 31 आणि अफगाणिस्तानच्या 30 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. इंग्लंडच्या 21, युएईच्या 9, नेपाळच्या 8 तर बांगलादेशच्या 5 खेळाडूंनी या स्पर्धेच्या लिलावासाठी नोंदणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात