• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : संकटात सापडलेल्या राजस्थानला पुन्हा धक्का, शेवटची 'आशा'ही मावळली

IPL 2021 : संकटात सापडलेल्या राजस्थानला पुन्हा धक्का, शेवटची 'आशा'ही मावळली

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) राजस्थान रॉयल्ससमोर (Rajasthan Royals) असलेली संकटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. टीमचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) या मोसमात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) राजस्थान रॉयल्ससमोर (Rajasthan Royals) असलेली संकटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. टीमचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) या मोसमात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे इंग्लंडला रवाना झाला, तिकडे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आर्चर पुन्हा एकदा आयपीएल खेळण्यासाठी येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, पण या सर्व शक्यता आता मावळल्या आहेत. जोफ्रा आर्चर आता पुढच्या आठवड्यापासून ससेक्ससोबत ट्रेनिंगला सुरुवात करेल, तसंच मे महिन्याच्या मध्यात तो काऊंटी चॅम्पियनशीपही खेळेल. भारतात परतायचं असेल, तर आर्चरला नियमानुसार 8 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं असतं. आर्चरच्या दुखापतीवर सुरू असलेल्या उपचारांसाठी हे योग्य नव्हतं, म्हणून इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि राजस्थान रॉयल्स यांनी हा निर्णय घेतला आहे. जोफ्रा आर्चरच्या बोटाला आणि खांद्याला दुखापत झाली होती. राजस्थान रॉयल्सला याआधी त्यांचा महत्त्वाचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सलाही गमवावं लागलं. पहिल्याच सामन्यात स्टोक्सचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे तोदेखील इंग्लंडला रवाना झाला. दुसरीकडे इंग्लंडचाच लियाम लिव्हिंगस्टोनही बायो-बबलला कंटाळून मायदेशी निघून गेला, त्यामुळे राजस्थानसमोरच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सची खराब कामगिरी सुरूच आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी फक्त एकाच सामन्यात त्यांचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्येही राजस्थानची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.
  Published by:Shreyas
  First published: