फिक्सिंगमध्ये अडकलेला खेळाडू पुन्हा क्रिकेट खेळणार, BCCI ने बंदी उठवली

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झालेल्या अंकित चव्हाण (Ankeet Chavan) याच्यावरची आयुष्यभरासाठी घातलेली बंदी बीसीसीआयने (BCCI) उठवली आहे. या निर्णयामुळे 35 वर्षांचा अंकित चव्हाण आता पुन्हा एकदा क्रिकेट खेळू शकतो.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झालेल्या अंकित चव्हाण (Ankeet Chavan) याच्यावरची आयुष्यभरासाठी घातलेली बंदी बीसीसीआयने (BCCI) उठवली आहे. या निर्णयामुळे 35 वर्षांचा अंकित चव्हाण आता पुन्हा एकदा क्रिकेट खेळू शकतो.

  • Share this:
    मुंबई, 16 जून : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झालेल्या अंकित चव्हाण (Ankeet Chavan) याच्यावरची आयुष्यभरासाठी घातलेली बंदी बीसीसीआयने (BCCI) उठवली आहे. या निर्णयामुळे 35 वर्षांचा अंकित चव्हाण आता पुन्हा एकदा क्रिकेट खेळू शकतो. अंकित चव्हाणसोबत एस श्रीसंत (Sreesanth) आणि अजित चंडीला (Ajit Chandila) यांनाही अशाचप्रकारची शिक्षा देण्यात आली होती. हे तिन्ही खेळाडू त्यावेळी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमचा भाग होते. बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन (Hemang Amin) यांनी स्पष्ट केलं की लोकपालनी दिलेला आदेश आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार अकिंत चव्हाण याच्यावरची आजीवन बंदी 7 वर्षांची करण्यात येत आहे, म्हणजेच त्याला करण्यात आलेली शिक्षा मागच्या सप्टेंबर महिन्यात संपली आहे. बंदी हटवल्यानंतर अंकित चव्हाण याने आपण खूष असल्याची प्रतिक्रिया दिली. यासाठी त्याने बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेटचेही आभार मानले. कोरोना संकट आणि पाऊस असतानाही मी मैदानात उतरण्यासाठी आतूर आहे, असं अंकित चव्हाण म्हणाला. अंकित चव्हाण पर से आजीवन प्रतिबंध हटा दिया गया है. (PIC: AFP)
मागच्या वर्षी बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांनी श्रीसंतवरची आजीवन बंदी 7 वर्ष केली, यानंतर त्याने केरळकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. आयपीएल 2021 मध्ये श्रीसंतने स्वत:ला लिलावासाठी उपलब्ध केलं, पण त्याला कोणीही विकत घेतलं नाही. श्रीसंतवरची बंदी जेव्हा कमी करण्यात आली तेव्हापासून अंकित चव्हाणनेही आपल्यावरची बंदी कमी करावी आणि प्रत्येकाला सारखाच नियम लावावा, अशी मागणी बीसीसीआयकडे केली. यासाठी त्याने बीसीसीआयसोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिलं. अंकित चव्हाणने आपल्या करियरमध्ये 18 प्रथम श्रेणी, 20 लिस्ट ए आणि 26 टी-20 मॅच खेळल्या. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 53, लिस्ट एमध्ये 18 आणि टी-20 मध्ये 19 विकेट मिळाल्या. आयपीएलमध्ये त्याने 13 मॅच खेळून 8 विकेट घेतल्या. 2013 साली राजस्थान रॉयल्सकडून खेळलेले श्रीसंत, चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते.
    Published by:Shreyas
    First published: