Home /News /sport /

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा, टेस्ट सीरिजचं वेळापत्रक निश्चित

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा, टेस्ट सीरिजचं वेळापत्रक निश्चित

टीम इंडिया (Team India) या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पहिले मर्यादित ओव्हरची सीरिज खेळेल आणि मग टेस्ट सीरिजला सुरुवात होईल.

    मेलबर्न, 16 ऑक्टोबर : टीम इंडिया (Team India) या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पहिले मर्यादित ओव्हरची सीरिज खेळेल आणि मग टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियातल्या संपूर्ण दौऱ्यात खरंतर पहिले टेस्ट सीरिज आणि मग मर्यादित ओव्हरची सीरिज खेळवली जाते, यावेळी मात्र दौऱ्यात बदल करण्यात आले आहेत. वनडे आणि टी-20 सीरिजचं वेळापत्रक अजून निश्चित करण्यात आलं नसलं, तरी 4 टेस्ट मॅचच्या तारखा आणि ठिकाणं ठरवण्यात आली आहेत. सीरिजची पहिली टेस्ट 17-21 डिसेंबर ऍडलेडला, दुसरी टेस्ट 26-30 डिसेंबर दरम्यान मेलबर्नला, तिसरी टेस्ट 7-11 जानेवारी दरम्यान सिडनीला आणि 15-19 जानेवारी दरम्यान ब्रिस्बेनला चौथी टेस्ट खेळवली जाईल. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हा दौरा रद्द करण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अर्ल एडिंग्स यांनी मात्र आपण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संपर्कात असून दौरा 100 टक्के होईल, असा विश्वास व्यक्त केला. क्वीन्सलँडमधल्या क्वारंटाईनच्या कठोर नियमांमुळे टीम इंडिया पर्थ किंवा ऍडलेडऐवजी ब्रिस्बेनला उतरणार असल्याचं वृत्तही द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राने दिलं आहे. 10 नोव्हेंबरला आयपीएलची फायनल झाल्यानंतर टीम इंडिया युएईमधूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, जेम्स पॅटिनसन, ऍलेक्स कॅरी हे ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. तेदेखील ऑस्ट्रेलियाला लगेचच रवाना होतील. या खेळाडूंनाही भारतीय खेळाडूंप्रमाणेच ऑस्ट्रेलियात 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या