बॉलिवूड अभिनेत्रींनाही दिसण्यात टक्कर देतात भारतीय महिला खेळाडू. यामध्ये भारतीय क्रिकेटर स्मृती मंथानाचाही समावेश आहे. स्मृती तिच्या फलंदाजीमुळे ओळखली जाते. याशिवाय तिला राष्ट्रीय क्रश म्हणूनही ओळखलं जातं. महिला क्रिकेटर राधा याधव देखील दिसायला सुंदर असून तिचेही अनेक चाहते आहेत. राधा सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. भारतीय क्रिकेट हरलीन देओलला स्टार खेळाडूही म्हटलं जातं. क्रिकेटशिवाय तिला नृत्यातही आवड आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत तिचे अनेक फोटो शेअर करत असते. महिला क्रिकेटर तानिया भाटीयाही दर्जेदार खेळते. तिच्या फलंदाजीनं तिनं अनेकांना वेड लावलं आहे. तानिया दिसण्यातही कोणत्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही . तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर दिसण्यात मॉडेलपेक्षा कमी नाही. हरमनप्रीत खूप स्टायलिश देखील आहे. तिचाही मोठा चाहता वर्ग आहे.