• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs ENG : लग्नाच्या 10 दिवसानंतर संजना कामावर परतली, बुमराह मात्र अजून सुट्टीवर

IND vs ENG : लग्नाच्या 10 दिवसानंतर संजना कामावर परतली, बुमराह मात्र अजून सुट्टीवर

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) कामावर परतली आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या दुसऱ्या वनडे आधी स्टार स्पोर्ट्सवर संजनाने शोचं एँकरिंग केलं

  • Share this:
    पुणे, 26 मार्च : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) कामावर परतली आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या दुसऱ्या वनडे आधी स्टार स्पोर्ट्सवर संजनाने शोचं एँकरिंग केलं, यावेळी संजनासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि इरफान पठाणही होते. संजना गणेशनचे या शोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संजना पेशाने स्पोर्ट्स एँकर आहे आणि स्टार स्पोर्ट्सच्या टीमचा भाग आहे. बुमराह आणि संजना यांनी 15 मार्चला गोव्यात लग्न केलं, यानंतर गुरुद्वारामध्ये विधी पार पडले. कोरोनामुळे या लग्न सोहळ्याला दोघांच्या कुटुंबामधली ठराविक 20 माणसं उपस्थित होती. बुमराह आणि संजनाने लग्नानंतर आपले फोटो सोशल मीडियावर शेयर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. यानंतर या दोघांच्या लग्न सोहळ्यातले मेहेंदी, हळद, संगीत या कार्यक्रमांचे फोटोही व्हायरल झाले. त्याआधी बुमराहने वैयक्तिक कारण देत इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट तसंच टी-20 आणि वनडे सीरिजमधून माघार घेतली. sanjana ganesan, jasprit bumrah, cricket news बुमराहने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लग्नाची बातमी दिली. प्रेमाने प्रेरित होऊन, आम्ही दोघांनी नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे. आज आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस आहे, असं बुमराह त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. कोण आहे संजना गणेशन? संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. तसंच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या टीमसाठीही एँकरिंग करते. संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या सिम्बोयसिस इन्स्टिट्यूटमधून संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती. संजनाने आयपीएलमध्ये केकेआर डायरीज नावाचा कार्यक्रमही केला. 2016 साली ती कोलकात्याच्या टीमशी जोडली गेली आणि नाईट क्लब नावाचा शोदेखील ती करायची.
    Published by:Shreyas
    First published: