मुंबई, 1 जुलै: भारतीय वंशाचा अमेरिकी मुलगा अभिमन्यू मिश्रानं (Abhimanyu Mishra) इतिहास रचला आहे. न्यू जर्सीमध्ये राहणारा अभिमन्यू जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने (12 वर्ष 4 महिने आणि 25 दिवस) इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर होण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. अभिमन्यूनं रशियाच्या सर्गेई कर्जाकीम (12 वर्ष 7 महिने) रेकॉर्ड मोडला आहे. बुडापेस्टमध्ये झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत अभिमन्यूनं भारतीय ग्रँडमास्टर लिऑन मेनडोन्का (Leon Mendonca) याला पराभूत करत हा विक्रम केला. अडीच वर्षांचा असताना सुरुवात अभिमन्यूचे वडील हेमंत मिश्रा न्यू जर्सीमध्ये डेटा मॅनेजमेंटचं काम करतात अभिमन्यू अडीच वर्षाचा होता तेव्हाच त्यांनी त्याला हा खेळ शिकवला. त्याने पाचव्या वर्षापासूनच स्थानिक स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. अभिमन्यूनं सुरुवातीपासूनच त्याच्या वडिलांच्या वयाच्या खेळाडूंना हरवण्यास सुरुवात केली. त्याने वयाच्या नवव्या वर्षी 70 वर्षांच्या अनुभवी खेळाडूला पराभूत केले होते, अशी आठवण त्याचे कोच अरुण प्रसाद यांनी सांगितली. “अभिमन्यूमध्ये असमान्य गुणवत्ता असल्याची आमची खात्री होती. तो जे काही पाहतो ते त्याला लक्षात राहते. त्याला आजही 2014 किंवा 2015 साली झालेल्या मॅचमधील चाली लक्षात आहेत,” असे प्रसाद म्हणाले. थक्क करणारा प्रवास अभिमन्यू सातव्या वर्षांपासून अमेरिकेत चर्चेत आहे. तो अमेरिकेतील सर्वात कमी वयाचा राष्ट्रीय विजेता आहे. त्यानंतर वयाच्या 10 वर्षीच त्याने जगातील सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा रेकॉर्ड केला. यावेळी त्याने भारताचा आर. प्रागनंदाचा रेकॉर्ड मोडला होता. ‘शाहिद आफ्रिदीनं माझ्याविरुद्ध बंड केलं’, पाकिस्तानच्या माजी कॅप्टनचा मोठा आरोप अभिमन्यूनं या विजयानंतर ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला बोलताना सांगितले की, “लियॉन विरुद्धची लढत अवघड होती. त्याने शेवटच्या टप्प्यात काही चुका केल्या. त्याचा मला फायदा मिळाला. या विजयामुळे जगातील सर्वात कमी वयाचा मी ग्रँडमास्टर बनलो आहे. याचा मला आनंद आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.