मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भारताने घेतला इंग्लंडचा 'बदला', Commonwealth Games मधून हॉकी टीमची माघार

भारताने घेतला इंग्लंडचा 'बदला', Commonwealth Games मधून हॉकी टीमची माघार

कोरोना व्हायरसची चिंता आणि ब्रिटन सरकारने प्रवाशांना लावलेल्या भेदभावपूर्ण नियमांमुळे 2022 साली होणाऱ्या बर्मिंघम कॉमनवेल्थ खेळातून (Birmingham Commonwealth Games) भारतीय हॉकी टीमने (Indian Hockey Team) माघार घेतली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : कोरोना व्हायरसची चिंता आणि ब्रिटन सरकारने प्रवाशांना लावलेल्या भेदभावपूर्ण नियमांमुळे 2022 साली होणाऱ्या बर्मिंघम कॉमनवेल्थ खेळातून (Birmingham Commonwealth Games) भारतीय हॉकी टीमने (Indian Hockey Team) माघार घेतली आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबम यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना याबाबत माहिती दिली. ब्रिटन सरकारने भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. ब्रिटनने एक दिवस आधीच भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यालाच प्रत्युत्तर म्हणून भारतीय हॉकी टीमने कॉमनवेल्थमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

बर्मिंघम कॉमनवेल्थ खेळ आणि आशियाई खेळांमध्ये फक्त 32 दिवसांचं अंतर आहे. कॉमनवेल्थ 28 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहे, तर आशियाई खेळ (Asian Games) 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान होतील. एवढं कमी अंतर असताना आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, असं हॉकी इंडियाने सांगितलं आहे. 'आशियाई खेळ पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic 2024) च्या क्वालिफिकेशनसाठीची स्पर्धा आहे. त्यामुळे आशियाई खेळांची प्राथमिकता लक्षात घेता हॉकी इंडिया कॉमनवेल्थ खेळासाठी पाठवणार नाही. आम्ही कोणत्याही खेळाडूबाबत कोरोना संक्रमित होण्याचा धोका पत्करू शकत नाही,' असा खुलासा हॉकी इंडियाने केला आहे.

लसीकरणानंतरही क्वारंटाईनचा नियम

ब्रिटनने भारताच्या कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्राला मान्यता द्यायला नकार दिला आहे, त्यामुळे भारतातून इंग्लंडमध्ये गेलेल्या प्रवाशाने लसीचे दोन्ही डोस घेतले असले, तरी त्याला 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागतं. ब्रिटनच्या या नियमानंतर भारतानेही इंग्लंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अशाचप्रकारचे नियम केले. इंग्लंडमधून भारतात आलेल्या प्रवाशांना 72 तासांमध्ये आरटी-पीसीआर रिपोर्ट देणं बंधनकारक करण्यात आलं. भारतात पोहोचल्यानंतर विमानतळावर आणि मग आठव्या दिवशी त्यांच्या दोन आरटी-पीसीआर टेस्ट करव्या लागणार आहेत.

First published:

Tags: Hockey