Home /News /sport /

कोरोनाने घेतला या क्रिकेटरच्या वडिलांचा बळी, म्हणाला, 'माफ करा...मी वाचवू शकलो नाही'

कोरोनाने घेतला या क्रिकेटरच्या वडिलांचा बळी, म्हणाला, 'माफ करा...मी वाचवू शकलो नाही'

गोलंदाज राहुल शर्मा वडिलांना आठवताना कमालीचा भावुक झाला आहे.

    मुंबई, 21 मार्च : कोरोनोनं जगभरात असंख्य लोकांचे जीव घेतले आहेत. हा सत्र अजूनही सुरू आहे. अनेक दिग्ग्ज अभिनेते, कलावंत, लेखक कोरोनामुळं जग सोडून गेले. (Rahul sharma India cricketer) आता नुकतंच भारतीय क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व केलेला स्पिनर गोलंदाज राहुल शर्मा यानं कोरोनामुळं आपल्या वडिलांना गमावलं. राहुलनं स्वतः आपल्या यक्तिक अकाऊंटवरून ट्विट करत ही माहिती दिली. (rahul sharma latest news) राहुलनं 2006 मध्ये पंजाबसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये करियरची सुरवात केली होती. यानंतर 2010 मध्ये त्याला आयपीएल डेक्कन चार्जर्ससाठी निवडलं गेलं. त्यानं शेवटची अतांतरराष्ट्रीय मॅच 2010 मध्ये खेळली होती. वडिलांसाठी लिहिली हळवी पोस्ट आपल्या वडिलांच्या निधनाबाबत कळवताना राहुलनं एक अतिशय हळवी पोस्ट लिहिली आहे. त्यानं उद्गार काढले आहेत, शर्मा साहेब, 'खूप घाई केली तुम्ही... माफ करा तुम्हाला या कोरोनापासून वाचवू शकलो नाही. हेही वाचा कुस्तीच्या सामन्यातला पराभव लागला जिव्हारी; गीता फोगटच्या बहिणीची आत्महत्या तुमच्याविना आता आयुष्य पूर्वीसारखं असणार नाही. ते  सगळं काही,जे मी तुमच्याकडून शिकलो - फायटिंग स्पिरिट, इच्छाशक्ती, मेहनत आणि समर्पण, ते माझ्या सोबत राहील. लव्ह यू फॉरएव्हर.' (rahul sharma father dies) ड्रगच्या प्रकरणात अडकलाय हा खेळाडू 2012 साली राहुल शर्मा याला मुंबई पोलिसांनी ड्रग्जच्या प्रकरणात अटक केली होती. त्याच्यासोबत साऊथ  वेन पार्नेल हासुद्धा होता. (rahul sharma remembers father on twitter) हेही वाचा धोनीचा 'मलिंगा लुक' फॅन्सना रुचला नाही, पाहा काय आहे या PHOTO मागचं गौडबंगाल दोन्ही क्रिकेट खेळाडू एका रेव्ह पार्टीमध्ये पकडले गेले होते. त्यांच्यावर 2013 मध्ये खटला दाखल केला गेला. 2015 मध्ये त्याची निवड चेन्नई सुपर किंग्जनं केली होती. मात्र खेळणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळालं नव्हतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Father passed away

    पुढील बातम्या