कोरोनामुळे भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचा मृत्यू; सेहवागने मागितली होती मदत

कोरोनामुळे भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचा मृत्यू; सेहवागने मागितली होती मदत

भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवाग याने काल ट्विटरवर प्लाझ्मा थेरेपीसाठी मदतीचं आवाहन केलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जून : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये नेत्यांसह विविध क्षेत्रात कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच भारतीय क्रिकेटमधील एका खेळाडूच्या वडिलांचा कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

भारतीय क्रिकेटपटू सिद्धांत डोबाल याचे वडील संजय डोबाल यांनी सोमवारी जगाला निरोप दिला. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोरोनाची लागण झाली होती. संजय स्वतः दिल्लीतील एक प्रसिद्ध क्लब क्रिकेटर होते. ते दिल्लीत अंडर 23 चे माजी सहाय्यक कर्मचारीही होते. 52 वर्षीय संजय हे काही दिवसांपासून जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. रविवारी माजी भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागनेही सोशल मीडियावर त्यांच्यासाठी मदत मागितली होती. दिल्लीचे माजी अष्टपैलू संजय यांच्या निधनाने संपूर्ण क्रीडा जगाला हादरा बसला आहे.

हे वाचा-भाजप आमदाराला कोरोना, फडणवीसांसह शरद पवारांच्या बैठकीला होते हजर!

भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवाग याने काल ट्विटरवर प्लाझ्मा थेरेपीसाठी मदतीचं आवाहन केलं होतं. मात्र त्यातच आज संजय डोबाल यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय क्रिकेट विश्वासाठी हा मोठा झटका आहे.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 29, 2020, 2:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading