मुंबई, 23 फेब्रुवारी : आपल्या मुलाचं नाव वेगळं ठेवण्याबाबत पालक खूप आग्रही असतात. शक्यतो महान व्यक्ती, देव, संत यांच्या नावांवरून मुलांची नावं ठेवली जातात. भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनंही त्याच्या मुलाचं नाव अशाच एका महान भारतीय संतांवरून ठेवला आहे.
टीम इंडियात मोहम्मद कैफने एक काळ गाजवला. दमदार बॅटिंग आणि फिल्डिंगच्या जोरावर त्याने संघात स्थान मजबूत केलं होतं. अलाहाबादच्या मोहम्मद कैफनं नोएडातली पत्रकार पूजा यादव हिच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुलांची नावंही खूप छान आहेत. 28 फेब्रुवारी 2012ला जन्म झालेल्या मुलाचं नाव त्यांनी 'कबीर' असं ठेवलंय. कबीर हे भारतातले थोर संत, कवी आणि समाजसुधारक होते.
हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मांच्या नागरिकांमध्ये त्यांना मानाचं स्थान होतं. असं म्हणतात की त्यांचा जन्म 1440मध्ये झाला, तर मृत्यू 1518मध्ये झाला. कबीर या नावाचा अर्थ महान, शक्तिशाली, ताकदवान असा होतो. मोहम्मद कैफने त्याच्या मुलाचं हे नाव ठेवून सर्व भारतीयांना आनंदाची भेट दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, T20 cricket