मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियाने इंग्लंडला लोळवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक

IND vs ENG : टीम इंडियाने इंग्लंडला लोळवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) इनिंग आणि 25 रनने विजय झाला आहे. या विजयासोबतच भारताने 4 टेस्ट मॅचची ही सीरिज 3-1 ने जिंकली आहे. सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) फायनलमध्येही विराटच्या टीमने धडक मारली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 6 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) इनिंग आणि 25 रनने विजय झाला आहे. या विजयासोबतच भारताने 4 टेस्ट मॅचची ही सीरिज 3-1 ने जिंकली आहे. सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) फायनलमध्येही विराटच्या टीमने धडक मारली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 160 रनची आघाडी मिळाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा 135 रनवर ऑल आऊट केला. अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर.अश्विनने (R. Ashwin) प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून डॅनियल लॉरेन्स याने सर्वाधिक 50 रन केले.

त्याआधी आजच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा 365 रनवर ऑल आऊट झाला. ऋषभ पंत (Rishabh Pant) याने 101 रनची तर वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) नाबाद 96 रनची खेळी केली. तळाच्या बॅट्समननी साथ न दिल्यामुळे सुंदरला टेस्ट कारकीर्दीमधलं त्याचं पहिलं शतक करता आलं नाही.

अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताची अवस्था 6 आऊट 146 अशी होती. त्यावेळी सुंदर बॅटींगला आला होता. या नाजूक परिस्थितीमध्ये त्यानं सुरुवातीला ऋषभ पंतला (Rishabh Pant) समर्थ साथ दिली. या जोडीनं सातव्या विकेटसाठी 113 रनची भागिदारी केली. या भागिदारीमुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतली. पंत 101 रन काढून आऊट झाल्यानंतरही सुंदर थांबला नाही.

या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा 205 रनवर ऑल आऊट झाला. अक्षर पटेलने 4 विकेट घेतल्या, तर अश्विनला 3, मोहम्मद सिराजला 2 आणि वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट घेण्यात यश आलं.

भारताच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं (Australia) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता भारत आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात ही फायनल खेळवली जाईल.

First published:

Tags: Axar patel, Cricket, Icc, India vs england, R ashwin, Rishabh pant, Washington sunder