श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजआधी (India vs Sri Lanka) भारतीय बॅट्समन फॉर्ममध्ये आले आहेत. टीम इंडियाच्या चार खेळाडूंनी इंट्रा-स्क्वॉड मॅचमध्ये अर्धशतकं केली आहेत. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या. मनीष पांडे (Manish Pandey) आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतक केलं.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने सर्वाधिक 84 रनची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 79 रन केले. मनिष पांडे 53 रन करून आऊट झाला. ऋतुराज गायकवाडनेही 75 रन करून वनडेमध्ये आपल्या पदार्पणाचा दावा ठोकून दिला आहे.
इंट्रा स्क्वॉडच्या या सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) अपयशी ठरला, त्याला खातंही उघडता आळं नाही. डावखुरा बॅट्समन देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. पडिक्कल 34 रन करून माघारी परतला.
या सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 75 रन करून आपण वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी तयार असल्याचं राहुल द्रविडला (Rahul Dravid) दाखवून दिलं. राहुल द्रविडला ऋतुराज गायकवाडची प्रतिभा ए टीमपासूनच माहिती आहे, त्यावेळी द्रविड ए टीमचा प्रशिक्षक होता.
हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) चांगला फॉर्म दाखवून टीम इंडियाला दिलासा दिला आहे. आयपीएल 2021 स्थगित होईपर्यंत पांड्याची बॅट शांत होती. इंट्रा स्क्वॉड सामन्यात पांड्याने बॉलिंगही केली. श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये पांड्या ऑलराऊंडर म्हणून खेळण्याची शक्यता आहे.
भारत-श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजची सुरुवात 13 जुलैपासून होणार आहे. सुरुवातीला 3 वनडे आणि मग 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) देण्यात आलं आहे, तर टीमचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे.