IND vs SL: अब पंगा होगा! 5 वर्षे, 73 सामन्यानंतर द्रविडच्या शिष्याला विराटनं दिली टीम इंडियात जागा

IND vs SL: अब पंगा होगा! 5 वर्षे, 73 सामन्यानंतर द्रविडच्या शिष्याला विराटनं दिली टीम इंडियात जागा

संजूनं 2015मध्ये झिम्बाम्वेविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर पाच वर्षांनी आज श्रीलंकाविरुद्ध संजू मैदानात उतरेल.

  • Share this:

पुणे, 10 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात आज पुण्यात अखेरचा टी-20 सामना होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दरम्यान या सामन्यात विराटनं संघात तीन मोठे बदल केले आहे. विराटनं ऋषभ पंतला डच्चू देत अखेर संजू सॅमसनला संघात जागा दिली आहे.

संजू सॅमसन गेले 8 टी-20 सामने संघात असूनही त्याला एकदाही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. ऋषभ पंतचा फॉर्म खास नसला तरी विराटनं संजूला संघात जागा दिली नाही. त्यावरून अनेक दिग्गजांनी विराटवर टिका केली होती. अखेर संजू सॅमसनला टीम इंडियात जागा मिळाली आहे. संजूनं 2015मध्ये झिम्बाम्वेविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर पाच वर्षांनी आज श्रीलंकाविरुद्ध संजू मैदानात उतरेल. संजूला 73 सामन्यांनंतर भारतीय संघात जागा मिळाली आहे. हा त्याच्या नावावर झालेला एक अजब रेकॉर्ड आहे.

यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स तयार झाले आहे. संजूला संघात जागा दिल्यामुळं नेटकऱ्यांनी विराट कोहलीचे आभारही मानले आहे.

भारताचा संघ- केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, विराट कोहली, मनीष पांडे, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल

विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजूची दमदार खेळी

केरळकडून खेळताना संजू सॅमसननं विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये यंदाच्या हंगामात द्विशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला होता. त्याशिवाय सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चार सामन्यात आतापर्यंत 112 धावा केल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून 93 सामन्यात संजूनं 27.61च्या सरासरीनं 2209 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय टीम इंडियाकडून 2015मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

भारत-श्रीलंका यांच्यातील टक्कर

भारत-श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 2009पासून एकूण 16 टी-20 सामने झाले आहेत. यातील 11 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर 5 सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली आहे. मुख्य म्हणजे भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या 6 द्विपक्षीय टी20 मालिकेत श्रीलंकेला एकदाही भारताला नमवता आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 10, 2020 07:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading