मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 364 दिवसानंतर मैदानात उतरली स्मृती आणि...

IND vs SA : 364 दिवसानंतर मैदानात उतरली स्मृती आणि...

भारतीय महिला टीम (Indians Womens Team) एका वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. 364 दिवसानंतर भारतीय महिला टीम आंतरराष्ट्रीय मॅच खेळत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लखनऊ, 7 मार्च : भारतीय महिला टीम (Indians Women's Team) एका वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. 364 दिवसानंतर भारतीय महिला टीम आंतरराष्ट्रीय मॅच खेळत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताला 50 ओव्हरमध्ये 177/9 पर्यंत मजल मारता आली. कर्णधार मिताली राजने सर्वाधिक 50 रनची खेळी केली, तर हरमनप्रीत कौर 40 रन करून आऊट झाली. स्मृती मंधाना 14 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनिम इस्माईलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर नोनकूलूलेको मलाबाला 2 विकेट मिळाल्या. मारिझेन काप, आयाबोंगा खाका आणि सुन लूसला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन वर्षानंतर वनडे मॅच होत आहे. या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 22 वनडे मॅच झाल्या आहेत. यापैकी 14 मॅचमध्ये भारताचा आणि 7 मॅचमध्ये आफ्रिकेचा विजय झाला, तर एका मॅचचा निकालच लागला नाही. हरमनप्रीत कौरची ही 100 वी वनडे मॅच आहे. हा विक्रम करणारी ती पाचवी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. भारताकडून सगळ्यात जास्त वनडे मॅच खेळण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. मिताली राजने 209 वनडे, झूलन गोस्वामीने 182 वनडे, अंजुम चोप्राने 127 आणि अमिता शर्माने 116 वनडे खेळल्या.

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसाठीही ही मॅच स्पेशल आहे. त्यांची ही 200 वी वनडे मॅच आहे. आफ्रिकेच्या टीमने आतापर्यंत खेळलेल्या 199 मॅचपैकी 100 मॅचमध्ये विजय मिळवला, तर 88 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. 200 वनडे मॅच खेळणारी दक्षिण आफ्रिका पाचवी टीम ठरली आहे. इंग्लंडच्या टीमने सर्वाधिक 351 वनडे खेळल्या आहेत, तर भारतीय टीम 272 वनडे मॅचमध्ये मैदानात उतरली.

कोरोना व्हायरसमुळे मागचं वर्षभर भारतीय महिला टीम मैदानात उतरली नव्हती. भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी 10 टक्के प्रेक्षकांना मैदानात यायची परवानगी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Cricket, India, International, South africa, Sports