पुढच्या महिन्यात होणार भारत-पाक सामना? असा आहे BCCIचा प्लॅन

पुढच्या महिन्यात होणार भारत-पाक सामना? असा आहे BCCIचा प्लॅन

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012नंतर पुन्हा होणार एकदिवसीय मालिका?

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट बोर्ड हा जगातला सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. त्यामुळं इतर सर्व देश हे भारताबरोबर क्रिकेट खेळण्यास उत्सुक असतात. दरम्यान सध्या परिस्थितीत कोणता देश भारतासोबत क्रिकेट खेळण्यास उत्सुक असेल तर तो देश आहे पाकिस्तान. भारत-पाकिस्तान यांच्यात मैदानावर आणि मैदानाबाहेर सतत द्वंद्व सुरू असते. सध्या पाकची अवस्था पाहता, पीसीबी भारतासोबत क्रिकेट खेळण्यासाठी गयावया करत आहे.

दरम्यान, भारतीय पुरुष संघानं पाकसोबत मालिका खेळण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीनं आता महिला संघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मात्र असे असले तरी, या मालिकेसाठी बीसीसीआयनं संमती दिलेली नाही. यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये मालिका होणार होती, मात्र बीसीसीआयनं केंद्र सरकारसोबत याबाबत अद्याप चर्चा केली नाही आहे.

पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयला केंद्र सरकारची परवागनी घ्यावी लागते. त्यामुळं भारत-पाक यांच्यातील मालिका होणार की नाही याबाबत साशंकता कायम आहे. पाकिस्तानचा हा दौरा आयसीसी महिला चॅम्पियनशीपचा भाग होता. या चॅम्पियनशीपमध्ये भारत-पाक यांच्यात तीन एकदिवसीय मालिका होणार होत्या. यात भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळायचा बहोता, मात्र सध्या दोन्ही देशांतील तणावपूर्ण वातावरणामुळं ते शक्य होईल असे दिसत नाही.

2012पासून भारत-पाक पुरुष संघात एकही एकदिवसीय सामना झालेला नाही. केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात खेळतात. यामुळं सगळ्यात जास्त नुकसान होत आहे ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे. त्यामुळं बीसीसीआयला समजवण्यासाठी सध्या पीसीबी कसरत करत आहे.

आशियाई कपमध्ये येणार आमने-सामने

दरम्यान, आगामी आशिया चषक स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात सप्टेंबर 2020 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपआधी या स्पर्धेचे आयोजन केलं जाणार आहे. तसेच, जर ही स्पर्धा भारतात झाली नाही तर सुरक्षेच्या कारणास्तव संयुक्त अरब अमीरातीमध्ये ही स्पर्धा होईल, असे बोलले जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीत, “जर भारतानं कोणता निर्णय घेतला तर त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद अंतिम निर्णय घेणार आहे. गेल्या वर्षी भारतात आशियाई कर होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी दुबईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं आताही आशियाई क्रिकेट परिषदेनंतर निर्णय घेतल्यानंतर काय होणार हे ठरवण्यात येईल.

वर्ल्ड कप टी-20च्या सराव सामन्यात भिडणार भारत-पाक

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपआधी भारत-पाकमध्ये सराव सामना होणार आहे. कारण आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत. त्यामुळं आयसीसीच्या वतीनं चाहत्यांसाठी भारत-पाक यांच्यात सराव सामना आयोजित करण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धांमध्ये 2012पासून एका ग्रुपमध्ये राहिले नाही आहेत. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 क्रिकेट वर्ल्ड कप रॉबीन राऊंड पध्दतीनं खेळले गेले. याआधी 2009 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकमध्ये सराव सामना झाला होता. अद्याप यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक सराव सामन्यासाठी बीसीसीआयनं परवानगी दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading