हेडिंग्ले, 25 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी (India vs England Third Test Day 1) टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 120/0 एवढा झाला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आता 42 रनची आघाडी आहे. दिवसाअखेरची हसीब हमीद 60 रनवर आणि रोरी बर्न्स 52 रनवर खेळत आहेत. त्याआधी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाचा 78 रनवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून जेम्स अंडरसन (James Anderson) आणि क्रेग ओव्हरटन (Craig Overton) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर सॅम करन (Sam Curran) आणि ओली रॉबिनसन (Ollie Robinson) यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) 19 रन आणि अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 18 रन केले. याशिवाय भारताचे सगळे बॅट्समन एक अंकी स्कोअर करून आऊट झाले.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्याचा हा निर्णय टीम इंडियाच्याच अंगाशी आला. जेम्स अंडरसनने (James Anderson) त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये भारताला 3 धक्के दिले. केएल राहुल (KL Rahul) शून्य रनवर, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) एक रनवर आणि विराट कोहली (Virat Kohli) 7 रन करून आऊट झाला. लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या 11 जणांनाच विराटने टीममध्ये संधी दिली आहे, त्यामुळे आर.अश्विनला (R Ashwin) पुन्हा एकदा टीमबाहेर बसावं लागलं आहे. तर इंग्लंडने टीममध्ये दोन बदल केले आहेत डॉम सिबलीच्या जागी डेव्हिड मलान (David Malan) आणि मार्क वूडच्या जागी क्रेग ओव्हरटन (Craig Overton) यांचा टीममध्ये समावेश झाला आहे.
लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.
भारतीय टीम
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंडची टीम
रोरी बर्न्स, हसीम हमीद, डेव्हिड मलान, जो रूट, जॉनी बेयरस्टो, जॉस बटलर, मोईन अली, सॅम करन, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिनसन, जेम्स अंडरसन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Joe root, Virat kohli