मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : कोहलीचं खणखणीत रेकॉर्ड, केन विलियमसनच्या विक्रमाशी बरोबरी!

IND vs ENG : कोहलीचं खणखणीत रेकॉर्ड, केन विलियमसनच्या विक्रमाशी बरोबरी!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये (India vs England) कोहलीने नाबाद 77 रन केले.

अहमदाबाद, 16 मार्च : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये (India vs England) कोहलीने नाबाद 77 रन केले, याचसोबत तो कर्णधार म्हणून सर्वाधिक 11 वेळा 50 पेक्षा जास्त स्कोअर करणारा खेळाडू ठरला आहे. टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत 6 विकेट गमावून 156 रन केले.

तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नाही, पण विराटने अर्धशतकी खेळी करून भारताचा स्कोअर 150 पर्यंत पोहोचवला. कोहलीने त्याच्या इनिंगमध्ये 46 बॉल खेळून 77 रन केले, यात 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. कोहलीने या मॅचआधी 10 वेळा कर्णधार असताना 50 पेक्षा जास्त स्कोअर केला होता. यातल्या 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 3 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. विराट कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार रन करणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.

मागच्या मॅचमध्येही विराटने नाबाद 73 रन केले होते, ज्यामुळे भारताचा विजय झाला होता. या मॅचमध्येही विराट आऊट झाला नाही. टी-20 करियरमध्ये विराटने 3078 रन केले, यात त्याने 27 वेळा 50 पेक्षा जास्तचा स्कोअर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे, पण त्याला अजून एकही शतक करता आलेलं नाही.

टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये कर्णधार असताना सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम सध्या विराट आणि केन विलियमसनच्या नावावर आहे. विलियमसन यानेही 11 वेळा कर्णधार असताना अर्धशतक केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचने 10 वेळा आणि इंग्लंडच्या इयन मॉर्गनने 9 वेळा अर्धशतक केलं. रोहित शर्माने कर्णधार असताना 7 वेळा 50 पेक्षा अधिकचा स्कोअर केला.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs england, T20 cricket, Virat kohli