जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्या-टेविटियाचं पदार्पण

IND vs ENG : टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्या-टेविटियाचं पदार्पण

IND vs ENG : टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्या-टेविटियाचं पदार्पण

इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), राहुल टेवटिया (Rahul Tewatia), इशान किशन (Ishan Kishan) आणि वरुण चक्रवर्ती यांचं भारतीय टीममध्ये पदार्पण झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), राहुल टेवटिया (Rahul Tewatia), इशान किशन (Ishan Kishan) आणि वरुण चक्रवर्ती यांचं भारतीय टीममध्ये पदार्पण झालं आहे. वरुण चक्रवर्ती याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्येही निवड झाली होती, पण ऐनवेळी दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी टी नटराजन याला संधी देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, तर भुवनेश्वर कुमारचं बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्यामुळे ही सीरिज महत्त्वाची मानली जात आहे. भारताच्या टी-20 टीममधून संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. तर रविंद्र जडेजा अजूनही दुखापतीतून बरा झाला नसल्यामुळे अक्षर पटेलला टी-20 टीममध्येही संधी देण्यात आली आहे. 12 मार्चपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. सीरिजच्या पाचही मॅच अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवल्या जातील.

जाहिरात

भारतीय टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल टेवटिया, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर टी-20 सीरिजचं वेळापत्रक 12 मार्च- पहिली टी-20 14 मार्च- दुसरी टी-20 16 मार्च- तिसरी टी-20 18 मार्च- चौथी टी-20 20 मार्च- पाचवी टी-20

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात