मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंड टीमची घोषणा, दोन प्रमुख खेळाडू बाहेर

IND vs ENG : दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंड टीमची घोषणा, दोन प्रमुख खेळाडू बाहेर

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडच्या (India vs England) टीमची घोषणा करण्यात आली आहे. जेम्स अँडरसन (James Anderson) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हे दोन प्रमुख खेळाडू इंग्लंडच्या टीममधून बाहेर आहेत.

  • Published by:  Shreyas

चेन्नई, 12 फेब्रुवारी : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडच्या (India vs England) टीमची घोषणा करण्यात आली आहे. जेम्स अँडरसन (James Anderson) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हे दोन प्रमुख खेळाडू इंग्लंडच्या टीममधून बाहेर आहेत. अँडरसनला इंग्लंड क्रिकेटच्या रोटेशन पॉलिसीनुसार विश्रांती देण्यात आली आहे, तर जोफ्रा आर्चरला दुखापत झाल्यामुळे तो दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही. याचसोबत डॉम बेस यालाही विश्रांती देण्यात आल्यामुळे त्याच्याऐवजी मोईन अलीला संधी मिळू शकते.

जोफ्रा आर्चरच्या उजव्या कोपराला दुखापत झाल्यामुळे तो दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. जोफ्रा आर्चरची जागा घेण्यासाठी क्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यात स्पर्धा असेल, तर जॉस बटलरच्याऐवजी बेन फोक्स विकेट कीपिंग करेल.

शनिवारपासून चेन्नईमध्येच दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरूवात होणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताला 227 रनने पराभव झाला होता. इंग्लंडचा भारतीय भूमीवरचा हा सगळ्यात मोठा विजय होता, तसंच 22 वर्षांनंतर भारताने चेन्नईमध्ये टेस्ट मॅच गमवाली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला ही टेस्टच जिंकावी लागणार नाही, तर सीरिजवरही कब्जा करावा लागणार आहे.

इंग्लंडची टीम

जो रूट, रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅनियल लॉरेंस, बेन स्टोक्स, ओली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, बेन फोक्स, ओली स्टोन

First published:

Tags: Cricket, India vs england, James anderson, Jofra archer, Sports