मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : एका दिवसात पडल्या 15 विकेट, चेन्नई टेस्टवर भारताची पकड

IND vs ENG : एका दिवसात पडल्या 15 विकेट, चेन्नई टेस्टवर भारताची पकड

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टवर भारताने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 15 विकेट पडल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टवर भारताने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 15 विकेट पडल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टवर भारताने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 15 विकेट पडल्या आहेत.

चेन्नई, 14 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टवर भारताने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 15 विकेट पडल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 54-1 एवढा झाला आहे. टीम इंडियाकडे आता 249 रनची आघाडी आहे. भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमन गिल (Shubhaman Gill) च्या रुपात एकमेव विकट गमावली. 14 रनवर जॅक लिचने गिलला आऊट केलं. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) 25 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 7 रनवर नाबाद खेळत आहे.

दुसऱ्या दिवसाची सुरूवात 300-6 अशी करणाऱ्या भारताने शेवटच्या 4 विकेट फक्त 29 रनवर गमावल्या. यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडच्या टीमने अश्विनच्या फिरकीपुढे लोटांगण घातलं. इंग्लंडचा पहिल्या इनिंगमध्ये फक्त 134 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताला 195 रनची मोठी आघाडी घेता आली. अश्विनने इंग्लंडच्या 5 खेळाडूंना माघारी धाडलं, तर इशांत शर्मा आणि अक्षर पटलेला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 329 रनपर्यंत मजल मारली. रोहित शर्माचं शतक तसंच अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे भारताने 300 रनचा टप्पा ओलांडला. रोहित आणि अजिंक्य यांच्यात चौथ्या विकेटसाठी 310 बॉलमध्ये 162 रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर ओली स्टोनला 3 विकेट, जॅक लीचला 2 आणि जो रूटला एक विकेट मिळाली.

First published: