Home /News /sport /

IND vs ENG : भन्नाट! आर्चरचा 141 किमीचा बॉल, पंतने मारली रिव्हर्स स्वीप सिक्स, पाहा VIDEO

IND vs ENG : भन्नाट! आर्चरचा 141 किमीचा बॉल, पंतने मारली रिव्हर्स स्वीप सिक्स, पाहा VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये (India vs England) ऋषभ पंतने (Rishabh Pant) जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) 141 किमी वेगाने टाकलेल्या बॉलवर रिव्हर्स स्वीप सिक्स मारला. पंतच्या या शॉटचं सगळीकडे कौतुक होत आहे.

    अहमदाबाद, 12 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये भारताचे (India vs England) टॉप-3 बॅट्समन अपयशी ठरले. केएल राहुल (KL Rahul), शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी मिळून फक्त 5 रन केले. विराट कोहली शून्य रन करून आऊट झाला. यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी भारताच्या इनिंगला आकार द्यायचा प्रयत्न केला. टीमचा स्कोअर वाढवण्यासाठी ऋषभ पंतने आक्रमण करायला सुरूवात केली, पण त्याला 21 रनच करता आले. या छोट्याश्या खेळीमध्ये पंतने जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर भन्नाट शॉट मारला. चौथ्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतने जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर विकेट कीपरच्या डोक्यावरून रिव्हर्स स्वीप सिक्स मारली. ऋषभ पंतने मारलेला हा शॉट क्रिकेटमधला सर्वोत्तम असल्याचं इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन म्हणाला आहे. तर युवराज सिंग यानेही ऋषभ पंतच्या या शॉटचं कौतुक केलं आहे. जोफ्रा आर्चरच्या 141 किमी प्रती वेगाने टाकलेल्या या बॉलवर पंतने हा अशक्य असा शॉट खेळला. याआधी चौथ्या टेस्टमध्येही ऋषभ पंतने इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स एँडरसनला अशाच पद्धतीने रिव्हर्स स्वीप सिक्स लगावली होती. भारताचे सुरूवातीचे बॅट्समन अपयशी ठरल्यामुळे त्यांना पहिल्या 6 ओव्हरमध्ये फक्त 22 रनच करता आले. तर 20 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 124-7 एवढा झाला. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 48 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली, यामध्ये एक सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Jofra archer, Rishabh pant, Shot, Sports, T20 cricket

    पुढील बातम्या