अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin) याने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) तिसऱ्या टेस्टमध्ये इतिहास घडवला आहे. जोफ्रा आर्चरची (Jofra Archer) विकेट घेत अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्याचा टप्पा गाठला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 400 विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 77 व्या टेस्टमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या आहेत. भारताकडून सगळ्यात जलद 400 विकेट घेण्याचा विक्रमही अश्विनच्या नावावर झाला आहे. याआधी हे रेकॉर्ड अनिल कुंबळेच्या नावावर होतं. कुंबळेने 85 टेस्टमध्ये 400 विकेट घेतल्या होत्या. या टेस्ट आधी अश्विनला 400 विकेट पूर्ण करायला 6 विकेटची गरज होती. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट घेत त्याने विक्रमाला गवसणी घातली.
सगळ्यात जलद 400 टेस्ट विकेट पूर्ण करण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने 72 टेस्टमध्ये हा आकडा पार केला होता. रिचर्ड हॅडली आणि डेल स्टेन यांनी 80-80 टेस्टमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या आहेत.
बॉलिंगसह बॅटिंगमध्येही अश्विनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 77 टेस्टमध्ये त्याने 28.12 च्या सरासरीने 2,643 रन पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर 5 शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मागच्याच टेस्टमध्ये अश्विनने शतकी खेळी करत, भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs Australia, IPL 2021, Jofra archer, R ashwin, Sports