मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मिताली-झूलनची ऐतिहासिक कामगिरी, गांगुली-द्रविड-कुंबळेचा विक्रम मोडला

मिताली-झूलनची ऐतिहासिक कामगिरी, गांगुली-द्रविड-कुंबळेचा विक्रम मोडला

भारतीय क्रिकेट टीमच्या मिताली राज (Mithali Raj) आणि झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 16 जूनला इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये मैदानात उतरताच या दोघींनी सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 जून : भारतीय क्रिकेट टीमच्या मिताली राज (Mithali Raj) आणि झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 16 जूनला इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये मैदानात उतरताच या दोघींनी सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा विक्रम मोडीत काढला आहे. मिताली राज आणि झूलन गोस्वामी या भारताकडून सर्वाधिक काळ टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत. या दोघींनी पहिली टेस्ट 2002 साली खेळली होती. भारतीय क्रिकेट इतिहासात फक्त सचिन तेंडुलकरचं करियरचं झूलन आणि मितालीपेक्षा जास्त आहे.

मिताली राज आणि झूलन गोस्वामीने 14 जानेवारी 2002 साली आपली पहिली टेस्ट खेळली, आता 16 जून 2021 ला त्या पुन्हा मैदानात उतरल्या, त्यामुळे त्यांची कारकिर्द 19 वर्ष 154 दिवसांची झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये वेरा बर्ट आणि मेरी हाईड यांची कारकिर्द मिताली आणि झूलनपेक्षा मोठी आहे. न्यूझीलंडच्या वेरा बर्टचं करियर 20 वर्ष 335 दिवसांचं आणि इंग्लंडच्या मेरी हाईडचं 19 वर्ष 211 दिवसांचं होतं.

मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांचं टेस्ट करियर सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे, एमएस धोनीपेक्षा जास्त काळ चालली आहे. कुंबळेचं करियर 18 वर्ष 88 दिवस, द्रविडचं करियर 15 वर्ष 222 दिवस, गांगुलीचं करियर 12 वर्ष 143 दिवस राहिलं. या कालावधीमध्ये द्रविडने 164, कुंबळेने 132 आणि गांगुलीने 113 टेस्ट खेळल्या.

मिताली राज 1999 पासून वनडे क्रिकेट खेळत आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळण्याचा विक्रमही तिच्याच नावावर आहे. याशिवाय वनडेमध्ये सर्वाधिक 7,098 रनही मितालीनेच केले आहेत. 38 वर्षांच्या झूलनच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 233 विकेट घेण्याचा विश्व विक्रमही आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Womens Team) 7 वर्षानंतर टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. याआधी त्यांनी शेवटची टेस्ट 2014 साली खेळली होती.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Mithali raj